प्रतिष्ठा न्यूज

ॲनिमल राहत आणि प्राणीमित्रांनी डांबरा मध्ये अडकलेल्या घोणस जातीच्या सापाला चार तास अथक प्रयत्न करून सुखरूप वाचवले आणि निसर्गात मुक्त केले.

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे 
सांगली :  येथील कोल्हापूर रोड वरील आकाशवाणी जवळ रस्त्याकडेला रस्ता दुरुस्त करून झाल्यावर निष्काळजीपणे टाकलेल्या डांबरामध्ये एक साप अडकल्याची माहिती जागृत नागरिकांनी प्राणीमित्र मंदार शिंपी, राकेश तळेकर यांना कळवली. प्राणीमित्रांनी तात्काळ जागेवर जाऊन पाहणी केली असता घोणस जातीचा अत्यंत विषारी साप त्याच्या तोंडापासून ते शेपटी पर्यन्त संपूर्ण डांबरा मध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळला. प्राणीमित्र मंदार
 शिंपी यांनी डांबरा मध्ये अडकलेल्या सापाला काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या सापाची तोंडापासून ते शेपटीपर्यंतची पोटाकडेची संपूर्ण बाजूच डांबरात अडकलेली असल्याने त्याला त्यातून सहज काढणे अशक्य झाले. त्यासाठी त्यांनी मदतीसाठी ॲनिमल राहत मध्ये कार्यरत असलेल्या प्राणीमित्र कौस्तुभ पोळ यांच्याशी संपर्क केला आणि सर्व परिस्थिती सांगितली, घोणस साप अत्यंत विषारी असल्याने  त्या परिस्थितीतून तसेच वाचवणे अशक्य म्हणून काही वेळासाठी बेशुद्ध करण्यासाठी भूलीचे इंजेक्शन देण्याचे ठरले,ॲनिमल राहतच्या पशुवैद्यकीय राकेश चितोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सापाला बेशुद्ध केले गेले आणि  सापाला डांबरातून सुखरून बाहेर काढण्यासाठी ॲनिमल राहत चे कौस्तुभ पोळं, प्रसाद सुर्यवंशी आणि प्राणीमित्र मंदार शिंपी याची धडपड सुरू झाली, डांबरातून सापाला वेगळे करणे अत्यंत अवघड होते त्यात साप विषारी त्याच्या जबड्यातील विषारी दातांपासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली डांबर आणि साप वेगवेगळे करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करण्यात आला सलग तीन तास प्रयत्न केल्यानंतर सापाला सुखरूप आणि कोणतीही इजा न करता वाचवण्यात यश आले. घोणस सापाला गरजेनुसार उपचार व विश्रांती देऊन शुद्धीत आल्यावर तो व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यावर सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!