श्री. डॉ. भारत पाटणकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना शरद पवार यांनी दिल्या भावनिक शुभेच्छा; कोल्हापूरात सत्कार संपन्न

श्री. डॉ. भारत पाटणकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्याला कोल्हापूर येथे उपस्थित राहिलो. पाटणकर यांचा सत्कार करताना अतिशय आनंद झाला.
ज्यांच्या सन्मानासाठी आणि अभिष्टचिंतनासाठी आपण अगत्याने याठिकाणी उपस्थित आहोत ते डॉ. भारत पाटणकर, या लोकसभा मतदारसंघाचे संसदेचे सभासद खासदार छत्रपती शाहू महाराज, शेजारच्या जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील, विधानसभेचे सन्माननीय सभासद ऋतुराज पाटील, ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले ते डॉ. गोपाळ गुरू, मनिषा गुप्ते, हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार ज्यांनी घेतला ते ॲड. कृष्णा पाटील, कॉ. संपत देसाई अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो.
आपलं सगळं आयुष्य समाजातील दलित, आदिवासी, दुष्काळग्रस्त आणि कष्टकरी या वर्गाच्यासाठी ज्यांनी घालवलं हे करताना नव्या पिढीच्या समोर, सर्वसामान्यांच्या समोर एक आधुनिक वैचारिक दृष्टिकोन मांडण्याच्यासाठी अखंड प्रयत्न ज्यांनी केले त्या भारत पाटणकरांचा सन्मान करण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आम्हा लोकांचं आणि त्यांचं काही गोष्टींच्या संदर्भामध्ये सतत चर्चा करून अतिशय जवळीक निर्माण होण्यासाठी बदल केले. त्यांनी महाराष्ट्राच्या विशेषतः दुष्काळी भागातल्या लोकांच्या महत्त्वाचा प्रश्नांच्यासंबंधी अत्यंत बारकाईने अभ्यास करून, लोकांना संघटित करून राज्य सरकारला या सगळ्यांवरची धोरण ही बदलायला लावण्यासंबंधीचा आग्रह हा त्यांनी सातत्याने ठेवला. त्याचे सुपरिणाम आज या ठिकाणी काही ठिकाणी बघायला मिळतायत. सांगलीसारखा जिल्हा , जत,आटपाडी यासारखा भाग, खटाव तालुक्याचा, अशी काही भाग असे काही परिसर आहेत. एकेकाळी सर्वसामान्य माणसाला दोन वेळेच्या अन्नासाठी संकट निर्माण करणारी अशी भीषण परिस्थिती केवळ मर्यादित पाण्याच्या अभावामुळ त्यांना त्याठिकाणी करायला लागत होती. त्यांच्या जीवनात बदल कसा करता येईल या प्रकारची आग्रही भूमिका पाटणकरांनी सातत्याने केली. कधी कधी गंमत वाटते, हा सगळा भाग प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी सतत जागरूक राहणाऱ्या अशा प्रकारचा आणि कष्ट करून जगण्याच्या संबंधीची साधन उपलब्ध करण्याची काळजी घेणारा अशा प्रकारचा हा परिसर आहे. एक काळ या भागामध्ये दुष्काळ हा विषय पाचवीला पुजलेला होता. जगायचं साधन नव्हतं पण लोकांच्यात हिंमत होती. काय वाट्टेल ते करणार. एक दिवशी मी दिल्लीमध्ये होतो. सकाळी तिथं मराठी भाषिक भेटायला येतात, अन्य भाषिक भेटायला येतात. आणि एक दिवशी काही लोकं आली भेटायला. मराठी होते. त्यांना विचारलं, कुठनं आलात? तर त्यांनी सांगितलं की सांगली जिल्ह्यातील जत आटपाडी तालुक्यातून आलो. म्हणलं इथ काय चाललंय? म्हणले इथं आमची सर्कस आहे. म्हणल सर्कस? हो म्हणले. दुष्काळामध्ये वाईट परिस्थितीमध्ये जगायचं कसं याची चिंता एकेकाळी होती, तेव्हा आमच्या बापजाद्यानी सर्कशीचा उद्योग काढला. आणि त्याचं नाव भगवान माळी असं काहीतरी नाव घेतलं. भगवान माळीनी पहिली सर्कस काढली. आणि जे लोक आले होते भेटायला ते सांगत होते की तिकडे दुष्काळ आहे. जगायचं कसं हा प्रश्न आहे आणि त्यासाठी आम्ही सुद्धा या सर्कशीच्या रस्त्याने गेलो आणि त्या ठिकाणी या टोकावरून त्या टोकावर, वाघाच्या तोंडात हात घालतो, आणखी काही काही चमत्कार दाखवतो,या सगळ्या गोष्टी मला दोन तीन सांगत होते. मला कौतुक याचं वाटतंय की या भागातला माणूस संकटावर मात करण्याच्यासाठी काहीही करेल.
आज देशाचा कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेलो ती विशेषतः दक्षिण भारतामध्ये आपण तमिळनाडूमध्ये गेलो किंवा केरळमध्ये गेलो तर माझा अनुभव अनेक वेळा असा आहे की विमानातून उतरलो की काही लोकं बाहेर भेटतात. राम राम साहेब. आयला म्हणलं, हे आपल्याकडचं दिसतय. राम राम एकदम म्हणतयं म्हणजे. त्याला विचारलं कुठनं आला? पहाऱ्यावरून आलोय. पहारा कुठं? या आटपाडीच्या जवळ. काय करतो? सोन काढतो. चांदी घालतो. तिकडं दुष्काळ आहे. संकटाची स्थिती आहे पण त्या संकटावर मात करून काही ना काही उद्योग केला पाहिजे त्यासाठी कष्ट केले पाहिजे. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही तुम्ही जा. सोन गाळणारे आणि चांदी गाळणारे या दुष्काळी भागाचे हे कष्टकरी आणलेले आहेत आणि त्याचं महत्त्वाचं कारण संकटावर मात करून सन्मानाने जगायचं हे सूत्र लोकांनी कायमचे ठेवलेल आहे. हे देशाच्या कानाकोपऱ्यात भेटतात. एकच आहे मुलाचं लग्न किंवा मुलीचे लग्न करायचं असेल तर गावाकडची पोरगी पाहिजे हे मात्र त्यांचा पक्क असत. अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या भागांमध्ये बदल होतोय आणि त्या बदलाची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये राज्याचं नेतृत्व वसंतदादांकडे असताना पाणी प्रश्नांच्या संबंधीचा आग्रह हा सातत्याने त्यांनी ठेवला. त्याचा परिणाम काहीना काही तरी नवीन प्रकल्प हे त्या सगळ्या परिसरामध्ये झाले. सर्व चित्र बदलतंय अशी स्थिती आहे. पण यामध्ये राजकीय मदत न घेता लोकांना संघटित करून आपण काय करू शकतो? आणि हे यशस्वी करू शकतो याबद्दलचा आग्रह आणि सूत्र हे डॉ. पाटणकर यांनी पहिल्यांदा त्या भागात केल. पुढे आपण बघितलं दुष्काळी भागाचा प्रश्न असेल, पाणी वाटपाच्या संबंधित भूमिका असेल असे अनेक कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतले. ते कार्यक्रम हातामध्ये घेऊन विशेषतः आज आपण बघतो की त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये पाणी आणि त्याचे वाटप या संबंधित कोणतीही भूमिका या सबंध परिसरामध्ये सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला. समान नागरी पाणीपुरवठा, पाणी वाटप याबद्दलची चळवळ त्यांनी मोठ्या प्रमाणात सुरू केली. त्याचा परिणाम आपल्याला आटपाडी, कवठे महांकाळच्या भागामध्ये दिसतो. त्यापलीकडे सोलापूर जिल्ह्यात जो दुष्काळी तालुका आहे तिथपर्यंत हे प्रकल्प पोहोचवले. पाण्याचा वापर योग्य कसा होईल यासाठी काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टींसाठी सातत्याने लक्ष देण्यासंबंधीची भूमिका ही डॉ. पाटणकर यांनी घेतली. हे सगळं करत असताना नव्या पिढीची वैचारिक स्थिती त्याच्यात बदलाव करण्यासाठी काही गोष्टींसाठी आग्रही भूमिका सातत्याने घेतली पाहिजे या दृष्टीने विशेषतः समाजातील गरीब वर्ग, आदिवासी असेल, कष्टकरी असेल या सगळ्यांच्या पुढे काम करणारे वैचारिक दृष्ट्या स्पष्ट असणारे कार्यकर्ते तयार करण्यासंबंधीची भूमिका ही आपल्या आयुष्यामध्ये अनेक वर्ष पाटणकर यांनी त्या ठिकाणी मांडली.
आज के बदलण्यासंबंधीची भूमिका किंवा पर्यायी विकास निधी किंवा महात्मा ज्योतिराव फुले अशा सगळ्या गोष्टींसंबंधी एक प्रकारची वैचारिक मांडणी नव्या पिढी समोर सातत्याने मांडण्याचे काम हे पाटणकरांनी केले. त्याची उपयुक्तता समाजाच्या फार मोठ्या वर्गाला बघायला मिळाले. मला त्यांच्या आणखी एक गोष्ट संबंधित कौतुक आणि आस्था वाटायची की त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये इतरांपेक्षा एक वेगळी चाकोरी निवडली. यातून गेल ऑमव्हेट या आल्या. अमेरिकेच्या एका राज्यामध्ये त्यांचा जन्म झाला. अमेरिकेच्या प्रसिध्द विद्यापीठामध्ये त्यांचे शिक्षण झाले. ते झाल्यानंतर ते महाराष्ट्रात येतात या सगळ्या दलितांच्या व उपेक्षितांच्या चळवळीमध्ये वाहून काय घेतात झोकुन काय घेतात आणि त्यांच्या जीवनामध्ये जीवनसाथी निवावण्याचा प्रसंग आल्यानंतर भारत पाटणकर यांना जीवनसाथी म्हणून निवड करतात. आणि त्यांच्या या सगळ्या कामांमध्ये पूर्णपणे साथ आणि सहकार्य देण्याची भूमिका घेतली. राहण्यासाठी अमेरिकेचे नागरिकत्व सोडले आणि अमेरिकेत राहायचं नाही या वर्गात आपण काम करतो त्या वर्गासोबत राहिलं पाहिजे. आपले मुक्काम पोस्ट तासेगाव जिल्हा सांगली आज त्या ठिकाणी येऊन उभा आयुष्य त्यांच्याबरोबर घालवलं. त्यांच्या जीवनासंबंधीचा कार्यपट आज जर आपण बघितला तर अनेक या उपेक्षितांच्या क्षेत्रामध्ये फार मोलाची कामगिरी उभा आयुष्य गेलने केली हे तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल. आम्हा लोकांना कधी संधी मिळाली त्याची सुतोवाच सांगण्याची तर त्या संधीचा पुरेपूर उपयोग घेत असे. त्यांच्याशी गप्पा मारणे सुसंवाद साधने वेगवेगळ्या क्षेत्रात मत भिन्नता जरी असली तरीसुद्धा भूमिका ऐकून घेणे या सगळ्या गोष्टीत एक वेगळा आनंद असायचा आणि तो आनंद माझ्यासारख्याला सुद्धा अनेकदा मिळाला आहे. म्हणून एक आदर्श अशा प्रकारचं जोडपं तुमच्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल.
आज अनेक प्रश्न देशासमोर येतात. विशेषतः जात जातीची भूमिका या गोष्टी आपल्या समोर येतात. त्यातून मार्ग काढावा लागेल. आजच्या राज्यकर्त्यांचा या सगळ्या प्रश्नांवरील दृष्टिकोन अतिशय चमत्कारिक अशा प्रकारचा आहे. पुन्हा एकदा कैक वर्ष हा समाज मागे नेण्यासंबंधीची भूमिका मांडली जाते. जाती जातींमध्ये,समाजा समाजामध्ये, धर्माधर्मामध्ये कटूता कशी वाढेल आणि त्यावर आधारित राजकारण हे सूत्र घेऊन काम करण्यासंबंधीची भूमिका आजचे राज्यकर्ते करत आहेत. त्यामुळे एक आव्हानाची स्थिती आज देशांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामधून मार्ग काढायचा असेल तर प्रयत्नांची पराकष्टा करावी लागेल. उभ्या आयुष्यामध्ये जे काही विचार पाटणकर यांनी मांडले या सगळ्या गोष्टींबद्दलचा आदर्श मनामध्ये ठेवून पुढची पाऊल टाकावी लागतील. फुलेंचा विचार असेल, रमाबाईंच्या संदर्भातील विचार असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक गोष्टी मांडल्या. समाजाबद्दलची विचारधारा बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांसमोर मांडली. हे सगळे सूत्र देण्याचा उपयोग विकासाचे पर्यायी सूत्र हे कसे मांडता येईल? याबद्दलचा विचार या उभयतांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये केलेला आहे. म्हणून हे अत्यंत एक विचार प्रवर्तक भूमिका घेणारे परिवर्तनाची चळवळ ही भूमिका घेऊन राबवण्यासाठी कष्ट करणारे व्यक्तिमत्व म्हणून आपण पाटणकरांकडे पाहतो. आज आयुष्याच्या ७५ व्या वर्षांपर्यंत ही व्यक्ती पोहचली तुमच्या माझ्या सगळ्यांच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. आणखी उभे आयुष्य उत्तम प्रकृती त्यांना लाभेल आणि हे काम त्यांनी हातामध्ये घेतले हे अखंडपणे चालू ठेवण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांची साथ त्यांना मिळेल, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो.
<span;>- *शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.*
https://www.facebook.com/share/p/192aKStKCK/?mibextid=oFDknk