प्रतिष्ठा न्यूज

तासगाव वाहतूक पोलिसांचे आरोग्य रामभरोसे ; शहरातील धुळ, ध्वनी प्रदूषनाणे बेजार…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सदरक्षणाय खलनिग्रहनाय हे पोलिसांचे ब्रिदवाक्य! ते सार्थ करण्यासाठी पोलिस रात्र अन् दिवस जागता पहारा देत असतात.पोलिसांना मित्र कमी तर शत्रु जास्त.खाकी वर्दीतल्या माणसाकडे समाज एका वेगळ्याच नजरेने पाहात असतो.यातीलच एक व्यवस्था म्हणजे वाहतूक व्यवस्था.व्ही आय पी लोकांचे दौरे,मोर्चे,आंदोलने, सण,समारंभ व निवडणुका यासह सर्वच ठिकाणी वाहतूक पोलिसांना वाहतुकीची व्यवस्था करावी लागते. तासगाव तालुका हा राजकीयदृष्ट्या जिल्हाभरात संवेदनशील म्हणून ओळखला जातो.माजी मंत्री स्व. आर.आर.आबा व माजी खा.संजय काका यांच्या बालेकिल्ल्यात काम करायला शासकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. कारवाई करताना गट,तट आडवे येत १० रुपयांसाठी मारामारीच्या घटना तासगावात घडल्या आहेत.तासगावात वाहतूक पोलिसांनी वाहनांना चांगली शिस्त लावली आहे.मात्र ही शिस्त लावताना वाहतूक पोलीस बेजार झाले आहेत.वाहतूक पोलिस म्हणजे पैसे खाणारा माणूस अशी प्रतिमा समाजात आहे.असा एखादा असेलही? परंतु दिवसभर गोंगाटात भर चौकात पुतळ्याप्रमाने ताठ उभे राहून सेवा बजावणाऱ्यांचे काय?धुळीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन करताना बिचारा पोलिस मात्र ध्वनी,वायू व अतिरिक्त कामाच्या ताणामुळे बेजार झालाय.ऐकू न येणे, श्वासनाचे विकार व अन्य आजारांनी वाहतूक पोलिस ग्रस्त आहेत.त्यांची आरोग्याची तपासणी गरजेची आहे, प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली असतानाही ते चौकात उभे राहतात. पोलिसांना अर्थपूर्ण दृष्टिकोणातून पाहिले जाते मात्र त्यांच्या आरोग्याचे काय? वाहनांचे कानठिळ्या बसवणारे हॉर्न व धुर याने दमा, रक्तदाब,डोळ्यांना अंधुक दिसणे पाठदुखी,गुडगेदुखी,अशा व्याधी आहेत.तासगावात पोलिसांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी शून्य उपाय योजना असल्याचे दिसत आहे.