प्रतिष्ठा न्यूज

विश्रामबाग, विजयनगर, वारणाली परिसराचा सुधीरदादांमुळेच विकास ; ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले विकासकामाबद्दल समाधान

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.३० : सुधीरदादा, तुम्ही गेल्या दहा वर्षात सांगलीसाठी भरपूर काम केले आहे. विश्रामबाग वारणाली परिसर आणि विजयनगर या भागाचा गेल्या दहा वर्षातच खरा विकास झाला आहे.सांगलीचा आणखी विकास होण्यासाठी आम्ही तुमच्याच पाठीशी राहणार आहोत,अशी ग्वाही विश्रामबाग परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी दिली.
विलिंग्डन महाविद्यालयाच्या मैदानावर तसेच परिसरात सकाळी फिरण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची तसेच खेळाडूंची आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट घेतली. त्यावेळी सर्वांनी सुधीरदादांनी गेल्या दहा वर्षात सांगलीसाठी केलेल्या कामाचे कौतुक केले आणि पुढील पाच वर्षे सांगलीचा अधिक गतिमान विकास करण्यासाठी आम्ही तुम्हालाच पुन्हा विजयी करू अशी ग्वाही दिली.
यावेळी नागरिक म्हणाले, विश्रामबाग आणि परिसरामध्ये पूर्वी कोणी फारसे लक्ष देत नव्हते. लोकप्रतिनिधींकडे नागरिकांची दादच लागत नव्हती. परंतु सुधीरदादांनीच गेल्या दहा वर्षात या भागाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. अनेक विकासकामे केली आहेत. नागरी सुविधांचे प्रश्न अतिशय समर्थपणे सोडवण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा त्यांच्याच पाठीशी उभे राहणार आहोत.
नागरिक म्हणाले, वारणाली येथील उड्डाणपूल सुधीर दादांच्यामुळेच पूर्ण झाला. सह्याद्रीनगरकडे जाणारा पूलही पूर्ण झाला. अनेक भागात पूर्वी रस्तेच नव्हते ते सुधीरदादांच्या मुळे झाले. आता सुधीर दादांच्यामुळेच सांगलीत अद्यावत व सुसज्ज असे नाट्यगृह लवकरच उभे राहत आहे. गेल्या दहा वर्षातच विश्रामबाग, विजयनगर, वारणारी या सर्व परिसराचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. त्या विकासाला सुधीरदादा गाडगीळ यांच्यामुळेच चालना मिळाली आहे.
सुधीरदादा गाडगीळ यांनी नागरिकांचे आभार मानले. ते म्हणाले, महायुती आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक यांचे सतत सहकार्य मिळाल्यामुळेच मी या भागाचा विकास करू शकलो. यापुढेही आपल्याला एक निश्चित आराखडा तयार करून संपूर्ण सांगली शहराचा विकास करायचा आहे. त्या दृष्टीने सर्वांचे मार्गदर्शन आणि मदत मला हवी आहे.
माजी नगरसेविका सविता मदने यांनी सुधीरदादांचे स्वागत केले. यावेळी भाजप नेते विजय साळुंखे, सागर बिजरगी, प्रथमेश वैद्य, अनिकेत खिलारे, कृष्णा कडणे, शिवम चव्हाण आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.