प्रचितगड किल्ला सुधीरदादांनी केला नागरिकांसाठी खुला ; रामटेकडी परिसरात मंडळाने साकारली उत्कृष्ट प्रतिकृती
प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.१ : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात एका टोकाला प्रचितगड हा शिवकालीन दुर्गम किल्ला आहे. या किल्ल्याची प्रतिकृती रामटेकडी परिसरातील गणेश कॉर्नर मित्र मंडळाने साकारली आहे. आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि श्रीफळ वाढवून ही प्रतिकृती नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली.
प्रचित गड हा प्रचित गड हा सांगली रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरील अतिशय दुर्गम असा किल्ला आहे या किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती गणेश कॉर्नर मित्र मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी उभी केली आहे सुधीर दादा गाडगीळ यांनी या प्रतिकृतीचे कौतुक केले यावेळी मंडळाचे महेश कदम आणि राहुल करनाळे यांनी या प्रतिकृतीबद्दल माहिती दिली.
या ठिकाणी प्रचितगड किल्ल्याची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. तसेच प्रचित गडापर्यंत कसे जाता येईल हे दाखवणारा नकाशाही लावला आहे. प्रचितगडची ही प्रतिकृती पाहण्यास नागरिकांची विशेषत: तरुण मंडळींची मोठी गर्दी झाली होती.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, नितीन शिंदे, अशोक शेट्टी, उर्मिला बेलवलकर, विजय साळुंखे, विश्वासराव गवळी, प्रसाद गवळी, विशाल पवार, प्रमोद सूर्यवंशी,अतुल माने आदि उपस्थित होते.