प्रतिष्ठा न्यूज

पहा,नाना काय म्हणाले… कोल्हापूरच्या स्वाभिमानाला दृष्ट

आज सकाळी विधानसभा निवडणूक माघारीचा शेवटचा दिवस, खासदार छत्रपती शाहू महाराज घरी आले. मी छत्रपतींच्या गादीचा नेहमीच सन्मान करीत असल्याने  त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी माझा अर्ज माघारी घेतला त्यानंतर कोल्हापुरात घडलेली नाट्यमय घटना कोल्हापूरच्या राजकारणाला दृष्ट लागण्याची वेळ आली आहे. या घटनेने मला, माझ्या कुटुंबाला व कार्यकर्त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला असून निर्माण झालेल्या परिस्थितीला राजकीय खेळी करणाऱ्या बेरकी लोकांच्या मानसिकतेला काय म्हणावे ?
मी शाहू नगरीच्या शाश्वत विकासासाठी व जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढवण्यास सज्ज होतो. मी माझ्या निवेदनाद्वारे नागरिकांना सांगू इच्छितो की माझी झालेली फसगत याचा विचार जनतेने करावा व यापुढे माझे सामाजिक काम पूर्वीप्रमाणे १०० टक्के चालू ठेवणार आहे.
वसंतराव मुळीक ( नाना ) 
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.