विष्णुदास भावे नाट्यमंदिरच्या वतीने डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते “नटराज पूजन” संपन्न
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : 5 नोव्हेंबर , मराठी रंगभूमीदिन निमित्य अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगली, विष्णुदास भावे नाट्यमंदिर च्या वतीने “नटराज पूजन” डॉ. जब्बार पटेल ,अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष यांच्या शुभहस्ते , ज्येष्ठ रंगकर्मी ,सुप्रसिद्ध अभिनेत्री ,यंदाच्या वर्षीच्या विष्णुदास भावे गौरवपदक मानकरी श्रीमती सुहास जोशी यांच्या उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे ,उपाध्यक्ष विनायक केळकर, कार्यवाह विलास गुप्ते, कोषाध्यक्ष सौ मेधा केळकर ,कार्यकारणी मंडळ सदस्य श्री .जगदीश कराळे, आनंदराव पाटील ,बलदेव गवळी ,माजी प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हनकर ,आर्किटेक विवेक देशपांडे ,भालचंद्र चितळे, नाट्य परिषद कार्यकारी मंडळ सदस्य सर्व सदस्य, पदाधिकारी, संस्थेचे सभासद, हितचिंतक ,कर्मचारी व नाट्य रसिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
त्यानंतर” नाट्य संगीत गायन” सांगलीतील हौशी कलाकार यांचे गायन कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाचे संयोजन सौ.स्वरदा खाडिलकर, राजेंद्र कानिटकर व शिष्य