35 वर्ष जे झाले नाही ते काकांनी करून दाखवले ; तासगावच्या पूर्व भागातील नागरिकांचा काकांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार
प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : तासगाव पूर्व भागाने आपल्या भागातील म्हणून 35 वर्षे ज्यांना साथ दिली त्यांनी सातत्याने विश्वासघात केला दरवेळेला गोड बोलून भावनिक होऊन आम्हाला फसवले मात्र जे पस्तीस वर्षात झाले नाही ते संजय काकांनी करून दाखवले असे म्हणत या विधानसभा निवडणुकीत तासगाव कवठेमंकाळ मध्ये परिवर्तन घडेल असा विश्वास तासगाव पूर्व भागातील नागरिकांनी व्यक्त केला
तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातील महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांनी तासगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाचा दौरा केला त्यांच्या या दौऱ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तासगाव तालुक्यातील लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनी घरोघरी औक्षण करून काकांना आशीर्वाद दिले.
वडगाव अंजनी गव्हाण जरंडी दहिवडी सिद्धेवाडी सावळज डोंगर सोनी या गावात काकांनी पदयात्रा काढून लोकांशी संपर्क साधला. यावेळी या भागात केलेल्या विविध विकास कामांची माहिती त्यांनी लोकांना दिली.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना संजय काका पाटील म्हणाले, महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणीसाठी दीड हजार रुपये महिन्याला देण्याची तरतूद केली यापुढील काळात दरमहा 2100 रुपये देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे मात्र हे विरोधकांना आवडलेले नाही ही योजना बंद व्हावी म्हणून अनेक जण कोर्टात गेले. निवडणूक आयोग तक्रार करून या योजनेचे लाभ देण्यात येऊ नये म्हणून प्रयत्न केले. मात्र निवडणुकीच्या निकालाच्या नंतर लगेचच या योजनेचे पैसे माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य सरपंच सोसायटीचे संचालक सभापती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.