गरीब आहे म्हणता मग वाटायला पैसे कुठून आणले : अजितराव घोरपडे यांचा संतप्त सवाल
माहिती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तासगाव कवठेमहांकाळचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजितराव घोरपडे सरकार बोलत होते
यावेळी बोलताना घोरपडे सरकार म्हणाले तासगाव कवठेमंकाळ मतदार संघाचा खरा विकास करायचा असेल तर आपल्या सर्वांना संजय काका पाटील यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करावी लागणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आपल्याला कवठेमंकाळ तालुक्याचा विकास करण्याचा व कवठेमंकाळ तालुक्यातील प्रलंबित कामे व नवीन विकास कामे करण्याचा शब्द दिलेला आहे.
2009 पासून कवठेमंकाळ मतदार संघाच्या आमदार म्हणून काम करणाऱ्यांनी कवठेमंकाळ साठी काय केले हा माझा प्रश्न आहे. काहीजण स्वतःला आता म्हैशाळचे जनक म्हणून घेत आहेत मात्र कवठेमंकाळ तालुक्यातील जनता सुज्ञ आहे म्हशाच्या पाण्यासाठी कोणी प्रयत्न केले कवठेमंकाळ तालुक्यात पाणी कधी आले हे आम्ही लोकांना सांगायची गरज नाही.