भावनिक होऊन मत मागायला जमत नाही : संजयकाका पाटील ; वर्षानुवर्ष फसवणाऱ्यांना जागा दाखवून देण्याचे सावळजकरांना केले आवाहन
प्रतिष्ठा न्यूज
सावळज प्रतिनिधी : मी काम करणारा मनुष्य आहे दुसऱ्या ची रेष पुसण्यापेक्षा माझी रेघ मोठी करून लोकांची कामे करण्यात मला रस आहे. दुसऱ्या बाजूला सातत्याने 40 वर्षे जो सावळज भाग ताकतीने पाठीमागे राहिला त्यांची फसवणूक करणारे आजपर्यंत हक्काचे पाणी न देऊ शकणारे लोक आहेत सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करा. आपला जन्म कोणाला्क तरी आमदार आणि खासदार करण्यासाठी नाही. तर आपला प्रपंच मोठा करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे सावळज भागातील लोकांनी विचारपूर्वक योग्य निर्णय घेऊन मतदान करावे असे आवाहन संजय काका पाटील यांनी केले.
एकेकाळी आबा गटाचा बालेकिल्ला असणाऱ्या सावळज मध्ये उच्चांकी गर्दीने झालेल्या ऐतिहासिक प्रचार सभेत संजय काका बोलत होते. यावेळी बोलताना काका म्हणाले
विसापूर पुनदी योजनेचे शेपूट सिद्धेवाडी तलावात सोडून हा तलाव तीन वेळा भरून देणार असं वचन तात्कालीक मंत्री महोदयांनी दिले होते मात्र प्रत्यक्षात
2014 साली 3000 हेक्टर पैकी फक्त 464 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळालं होत.विसापूर योजनेचे दोन पंप कधीच चालू झाले नाहीत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईगडबडीने योजना करण्यात आली.
एमआयडीसी आणली म्हणून तासगावत जेसीबीने गुलाल उधळून घेतला यापूर्वी फाईव्ह स्टार एमआयडीसीच्या घोषणा झाल्या होत्या. या Midc मध्ये 50 एकरात एक मध्यम प्रकल्प सुद्धा उभा राहू शकत नाही. 50 एकराच्या एमआयडीसीची जाहिरात करायला 55 लाख रुपये खर्च केले असा टोला काकांनी रोहित पाटलांना हाणला 1205 कोटी रुपये टेंभू योजनेसाठी मी आणले.सावळज पूर्व भागातील गावे आगोदरच समावेश असताना तालुक्याचे भावी नेते उपोषणास बसले.सिद्धेवाडी तलावातील डावा आणि उजवा कालवा साठी कोट्याधीशचा निधी मंजूर
झाला आहे गोरेवाडी कालव्यातुन तीन वर्षापासून सिद्धेवाडी तलाव भरला जातो आहे. पुढील काळात या भागाचा पाणी प्रश्न सोडवायला मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही यावेळी संजय काकांनी दिली
यावेळी बोलताना संजय काकांनी गेल्या 35 वर्षातल्या निष्क्रिय कारभारावर बोट ठेवले. बाळासाहेब देसाई या राज्याचे गृहमंत्री होते. त्यांनी हजारो लोकांना पोलीस मध्ये भरती केले. आपल्या गृहमंत्र्यांनी काय केल?शिक्षणाच्या बाबतीत काय विचार केला. कोणते उद्योग आबांनी मतदारसंघात आणले.मनेराजुरी अलकूड एमआयडीसीला विरोध करुन आबांनीच केला.
तासगाव रिंग रोडच्या विषयावर बोलताना काका म्हणाले रिंगरोड दिल्लीतून मी मंजूर करुन आणला. त्यासाठी 173 कोटींचा निधी मंजूर केला. कोणता रिंग रोड मंजूर हे माहीत नसलेल्यांनी दुसऱ्याच रस्त्यावर जाऊन फटाके उडवले
राजकारणातून संपवायचा प्रयत्न
मला राजकारणातून संपवायचा प्रयत्न सध्या सुरू आहे. कवठेमहांकाळ मध्ये खोटा गुन्हा दाखल करतायत म्हणून मी घाबरलो नाही. मी तोंड उघडल तर तुम्हाला रस्त्यावर फिरता येणार नाही. असा इशारा देताना काका म्हणाले आदर्श मध्ये कोणाचे फ्लॅट होते. कोणाची ईडी चौकशी झाली अंजनीतील एका क्लासवन अधिकाऱ्याच्या वडिलांनी कोणाच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली? हे प्रश्न उपस्थित करताना .कागदात चपाती गुंडाळून आणणाऱ्याचे पूण्यात फ्लॅट.आहेत अशी टीका हणमंत देसाई चे नाव न घेता त्यांनी केली
पैशाच्या जीवावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न….
निवडणुकीत प्रचंड पैशाचा वापर सुरू आहे त्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे
भाऊबीजला असा कोण धर्मात्मा होता जो साठेनगरला लोकांना पैसे वाटत होता. पैसेेे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्या्याचे पाप त्यांनी केले रोहित पाटील यानी त्यांचा मोबाईल फोन समोर आणावा आणि त्यादिवशी ते साठे नगर मध्ये नव्हते हे त्यांनी सिद्ध करावे. ते म्हणतील ती शिक्षा भोगायला सं जय पाटील तयार आहे. असे आव्हान त्यांनी यावेळी त्यांनी दिले.