संविधान रक्षणासाठी कटिबद्ध : रामदास आठवले; तासगाव कवठेमंकाळ मधील संजय काकांच्या पाठीशी राहण्याचे केले आवाहन
प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : संविधाला कोणालाही धक्का लावता येणार नाही. संविधान धोक्यात असल्याचा खोटा नरेटिव्ह चालवून लोकसभेला विरोधकांनी मोठी चाल खेळली पण 370 कलम आठवून कश्मीर आज संविधान लागू करून दाखवणाऱ्या महायुती सरकारने संविधानाचे खऱ्या अर्थाने रक्षण केले आहे.नरेंद्र मोदींचे नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मजबूत करणारे आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत संजय काका पाटील यांना मोठ्या मताधिक्याने लोक विजयी करतील असा विश्वास सामाजिक न्याय चे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला कवठेमंहाकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अजितराव घोरपडे यांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले
महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी सावळज येथे आयोजित प्रचार सभेत आठवले बोलत होते.
त्यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले माझी जन्मभूमी कवठेमंकाळ तर कर्मभूमी तासगाव आहे त्यामुळे माझ्या भागातील माझे लोक हे संजय काकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असं मला विश्वास आहे
यावेळी बोलताना माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार म्हणाले तासगांव तालुक्याचे गेल्या 35 वर्षे फक्त वाटोळं झाले आहे.विरोधकाकडे प्रचारचा कोणताही मुद्दा नसल्यामुळे फक्त खोटे आश्वासन देण्याचा उद्योग सुरु आहे.
तरुणाच्या हाताला काम मिळायला पाहिजे. म्हणून विकासाचे नवे पर्व सुरु करण्यासाठी महायुतीला संधी द्या.असे आवाहन त्यांनी केले यावेळी बोलताना संजय काका म्हणाले महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रामदास आठवले साहेबाना राज्यभर जावं लागतं आहे. तरीसुद्धा ते मला पाठींबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.संविधान बदलण्याच खोटं नरेटिव्ह विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत सेट केल्याचा फटका बसला.
सविधान बदलण्याचा निर्णय होणार नाही जर तसं काही झालं तर मी सगळ्यात पुढे त्याचा विरोध करण्यासाठी उभा राहीन.मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या.असे आवाहन संजयकाका पाटील यांनी केले
विरोधकावर प्रसंग आला आहे बाका
कारण याठिकाणी निवडून येणार आहेत संजयकाका
ओ बात करते है बडी बडी
लेकिन चुनके आने वाली है संजयकाका कि घडी
रामदास आठवले यांच्या कवितेची चर्चा संपूर्ण मतदारसंघ होती