प्रतिष्ठा न्यूज

जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना पाठिशी घालणाऱ्या महायुती शासनाचा महिलाच पराभव करणार ; सांगलीचे आमदार पृथ्वीराजबाबाच होणार : प्रियांका ऋतुराज पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.११: राज्यातील आमच्या जिजाऊ आणि सावित्रींच्या लेकीवर अमानुष लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधाम आरोपींना पाठीशी घालून महिलांचा अपमान व अप्रतिष्ठा करणाऱ्या भाजपा महायुती शासनाला आता मतातून महिलाच धडा शिकवतील. एकीकडे लाडक्या बहिणी म्हणायचं आणि त्याचवेळी महिलांच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगायचं हे आता सांगलीकर महिला खपवून घेणार नाहीत. महागाईच्या आगडोंबात आमची लेकरं बाळं उपाशी आहेत.. हे महायुती शासन आमदार फोडून सत्ता टिकवण्यात मश्गुल आहे. या शिंदे सरकारला गोरगरीब जनतेच्या व्यथा वेदना कळत नाहीत का? असा जळजळीत सवाल सामाजिक कार्यकर्त्या ज्योती अदाटे यांनी विचारला आहे.त्या पुढे म्हणाल्या सांगलीच्या आमदारांनी याबाबत विधानसभेत एकदाही प्रश्न विचारला नाही.आता आम्ही वीस तारखेला आमची ताकद दाखवून बेजबाबदार आणि अकार्यक्षम आमदाराला पराभूत करुन भाजपाला धडा शिकवणारच असा घणाघाती हल्ला
मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रकारांमध्ये अंकली, पद्माळे, खोतवाडी येथे पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारादरम्यान महिलांच्या बैठकीत त्या पोटतिडकीने बोलत होत्या.ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्नावर त्यांनी महायुती शासन आणि सांगलीचा अकार्यक्षम आमदार यांचा पर्दाफाश करतात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि सांगलीत पृथ्वीराज पाटीलच आमदार असू ठासून सांगताच महिलांचा टाळ्यांच्या गजरात मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी होता.

पृथ्वीराज पाटील हेच सुसंस्कृत उमेदवार असून तेच महिलांचा सन्मान करु शकतात.. महिलावर ज्या ज्या वेळी अत्याचार झाले त्या त्या वेळी त्यांनी रस्त्यावर उतरून स्थानिक प्रशासन व पोलीस खाते आणि महायुती शासनाला जाब विचारला आहे. सांगलीच्या बदलाचं व्हिजन त्यांच्या कडे आहे. तेच सांगली अधिक चांगली करण्यासाठी सक्षम आहेत. हात चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आता सांगलीकर महिलांनी ही निवडणूक हाती घेतली आहे असेही त्या म्हणाल्या.

यावेळी विजया पाटील म्हणाल्या, ‘महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत. यासाठी आरोपीवर कडक कारवाई केली पाहिजे. यासाठीच आमदार संवेदनशील असावा लागतो. पृथ्वीराजबाबा पाटील हे महिला बाबतीत संवेदनशील आहेत. ते आमदार झाले तर महिलांच्या हाताला काम देणार.. आपले प्रश्न विधानसभेत मांडून न्याय देणार असा विश्वास असल्यानेच सांगलीकर महिला प्रचंड संख्येने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
यावेळी आशा पाटील, ज्योती सुर्यवंशी, आश्विनी व महिला पुरुष नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.