प्रतिष्ठा न्यूज

महायुती सरकारने महाराष्ट्र कलंकीत केला सांगलीत वसंतदादांचा विचार वारसा पृथ्वीराजच पुढे नेत आहेत : आमदार डॉ. अमित देशमुख

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.११:सांगलीत वसंतदादांचा विचार वारसा पृथ्वीराजच पुढे नेत आहेत. निवडणूक ही केवळ निवडणूक नाही तर ती स्वाभिमानाची वैचारिक लढाई आहे.
सांगलीचा कोणताही प्रश्न असो पृथ्वीराज प्रामाणिकपणे राबतात. सांगलीसाठी ५०० बेडचे हाॅस्पिटल मी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना पहिल्यांदा पृथ्वीराज पाटील यांनी मागितले व २३३ कोटीचा निधीही मंजूर केला लोकसभेप्रमाणे विधानसभेला यश मिळणार आहे. २३नोव्हेंबरला पृथ्वीराज पाटील आमदार होणार आणि २५ नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा दावा करणार.
सांगलीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची क्षमता ही पृथ्वीराज पाटील यांच्याकडेच आहे. राज्यात ते सध्या आघाडीवर आहेत असा अहवाल आहे. २० नोव्हेंबरला हात चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या. सांगलीला काहीही कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ. अमित देशमुख यांनी केले. ते आज सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘महायुती शासनाचा पायाच भ्रष्टाचार हाच आहे. आमदार फोडणे, पक्ष व चिन्ह चोरुन अनैतिक मार्गाने सत्ता बळकावणे हेच काम महायुतीने केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र कलंकीत झाला आहे. महायुतीची जाती धर्मात तेढ निर्माण करुन फोडा व झोडा ही दुष्ट प्रवृत्ती महाराष्ट्राचे नुकसान करत आहे. महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यात शिक्षण, आरोग्य, व्यापार उद्योग, कृषी, महिला, सामाजिक न्याय इ. बाबीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.सामान्य माणसाला महाविकास आघाडी भावली आहे. तीच सत्तेवर येणार. ‘
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले,’ माझी लढाई भाजपबरोबर आहे. अपक्षाला मत म्हणजे भाजपाला मदत करण्यासारखे आहे. पाच वर्षे राबलो आता आपल्या सेवेसाठी पाच वर्षे मागतोय. ही निवडणूक तिरंगी नाही. दुरंगी लढत होणार आहे. कार्यशून्य भाजपा आमदार विरुद्ध पाच वर्षे राबवलेला पृथ्वीराज पाटील असे लोक म्हणतात. अपक्ष उमेदवारी लोकांना पसंद पडली नाही. लोक नाराज आहेत. सांगलीतील २० वर्षाचा आमदाराचा बॅकलॉग भरुन काढण्याची संधी मिळाली आहे. कोरोना काळात ५०० बेडचे हाॅस्पिटल मंजूर करुन आणले परंतु याचे श्रेय मला मिळेल म्हणून गेली अडीच वर्षे ते विद्यमान आमदारांनी होऊच दिले नाही हे सांगलीचे दुर्दैव आहे. महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि या हाॅस्पिटलचे भूमीपूजन आमदार अमित देशमुखच करणार त्यावेळी मी आपण केलेला आमदार उपस्थित राहणार. भाजपा सांप्रदायिक सद्भावना नष्ट करत आहे. फोडा आणि राज्य करा ही त्यांची कुनीती आहे. डॉ. विश्वजीत कदम हा वाघ माझ्याकडे आहे त्यामुळे सांगलीत माझा कोणीही पराभव करु शकत नाही. ठेकेदाराची घरे भरुन टक्केवारीचा हैदोस घालणाऱ्या भाजपाच्या विद्यमान आमदारांना मतदारच त्यांना घरी बसवणार आहेत. आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते यावेळी उत्तम मोहीतेंचा वाढदिवसाच्या सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. भाजपाच्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या अध्यक्षा अलका एडके यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्यावर त्यांचा सत्कार करण्यात आला. तानाजी व्हनमाने यांनी पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संजय बजाज, शंभूराज काटकर, सचिन जगदाळे, मुन्ना कुरणे, चंदनदादा चव्हाण, उत्तम मोहीते, सागर घोडके,अभिजित भोसले,निसारभाई, रज्जाक नाईक,किरण सुर्यवंशी, डॉ. नामदेव कस्तुरे, मयूर पाटील,सनी धोतरे, तौफिक शिकलगार, आयुब बारगीर गॅब्रीयल तिवडे,प्रा. एन.डी.बिरनाळे, ऋतुराज पाटील, पैगंबर शेख,उत्तम कांबळे, अशोकसिंग रजपूत, मौला वंटमुरे, आयुब निशाणदार, गौस नदाफ, अजय व प्रशांत देशमुख, विजया पाटील, ज्योती आदाटे, आशा पाटील, सुवर्णा पाटील व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. बिपीन कदम यांनी सूत्रसंचालन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.