प्रतिष्ठा न्यूज

अपक्ष जयश्री पाटील यांना वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष विठ्ठल (काका) पाटील यांचा पाठिंबा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली ता.११: सांगली विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष व जनतेचे उमेदवार श्रीमती जयश्री मदन पाटील यांना सांगली शहरासह उपनगरात वाढता पाठिंबा मिळत आहे.वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. समस्त वारकरी संप्रदाय आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे वारकरी संप्रदायचे अध्यक्ष विठ्ठल (काका) पाटील यांनी सांगितले.

वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय, असाच अर्थ घेतला जातो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ह्या आपल्या उपास्य दैवताच्या वारीला ह्या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहे, तितके अन्य कोणत्याही पंथाने त्याच्या उपास्य दैवताच्या वारीला दिलेले नाही. अशा या संप्रदायाचा आशीर्वाद मिळाल्याने जयश्री मदन पाटील ह्या निश्चितपणे निवडून येणार. जगाच्या कर्त्यानेच आशीर्वाद दिल्यासारखे वारकरी संप्रदायाने पाठिंबा देऊन आशीर्वाद दिला आहे.
यावेळी जयश्री पाटील म्हणल्या, वारकरी संप्रदायाच्या अनेक अडी अडचणी सोडवण्यासाठी स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांनी नेहमीच वारकऱ्यांना साथ दिली आहे. वारकरी संप्रदायाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटीबद्ध आहे.
वारकरी संप्रदायाने दिलेल्या जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल जयश्री पाटील यांनी वारकरी संप्रदायाचे आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.