पृथ्वीराज पाटील सांगलीत भाजपाचा पराभव करणार ; प्रभाग १८ मधील मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा – अभिजित भोसले
प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.१२: राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पृथ्वीराज पाटील गेली दहा वर्षे उत्कृष्ट काम करत आहेत. महापूर व कोरोना काळात त्यांनी दिलेला आधार सांगलीकर विसरणे शक्यच नाही. जात-पातीचं राजकारण त्यांच्या आसपास कधीच फिरकलं नाही. गेल्या निवडणुकीत नगण्य मतांनी ते पराभूत झाले परंतु पुन्हा जोमाने दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले हे त्याचं वेगळेपण आहे. काँग्रेसच्या कठीण काळात त्यांनी पक्षाचा झेंडा मिरवला ही त्यांची खरी पक्षनिष्ठा पक्षश्रेष्ठींनी लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली आहे. ही त्यांची उमेदवारी मेरीटची आहे. त्यांना सांगलीकर भरघोस मतांनी निवडून देणार. प्रभाग क्र. १८ मधील मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा आहे. असे उद्गार माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी काढले आहेत.
पृथ्वीराज यांच्याकडे शहराच्या विकासाची दूरदृष्टी आहे. सांगलीचे सामाजिक आरोग्य, सांस्कृतिक वारसा, उद्योग व्यापाराची भरभराट, शेतकरी व कष्टकरी कामगार कल्याण, महिलांची सुरक्षितता, दिन दलितांचा उध्दार त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी असल्याने सांगलीला ते आमदार म्हणून चांगले नेतृत्व देऊ शकतात म्हणून आज ही निवडणूक नेत्यांकडून जनतेच्या हाती आली आहे. सांगलीत हात एक नंबरला आणि भाजपा दोन नंबरला राहून पृथ्वीराज विजयी होणार असेही अभिजित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज पृथ्वीराजबाबा पाटील यांनी प्रभाग क्र. १८मधील त्रिमूर्ती काॅलनी, पोळ मळा, रामकृष्ण परमहंस सोसायटी या भागात मल्लिकार्जुन, दुर्गामाता, हनुमान, दत्तात्रय व स्वामी समर्थ मंदीरात दर्शन घेऊन गृहभेट व गृहबैठकीतून नागरिकांशी भेटून हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी अभिजित भोसले, रज्जाक नाईक, संभाजी पोळ, कैस शेख, चंद्रकांत पडसलगी, अल्ताफ मुल्ला, भारत चौगुले, आयुब मुल्ला, शंकर माने, लखन सुर्यवंशी, श्रीशैल माळी, रुपेश होवाळे, सौरभ जाधव, विकास पाटील, अनिल बारगीर, राजू नदाफ, धनाजी चव्हाण, सदा डफळापुरे, अभिजित शिंदे, महेश सोनार, अजिंक्य ताटे, अकलिनखान पठाण, अल्ताफ नदाफ, असिफ जमादार, युनूस बेलिफ व सुरेश जगदाळे आणि प्रभागातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.