प्रतिष्ठा न्यूज

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी साथ द्या रोहित पाटील..कवठेमहांकाळ तालुक्यात रोहित पाटील यांच्या प्रचारास मतदारांचा वाढता पाठिंबा..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार रोहित आर आर आबा पाटील यांचा प्रचाराचा झंझावात कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू आहे. रोहित पाटील यांच्या या प्रचार फेरीस गाव सभेस व भेटीस मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.या प्रचार सभे दरम्यान रोहित पाटील म्हणाले की तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक विकास कामे झाली आहेत काही प्रलंबित आहेत दोन्ही तालुक्यातील सिंचन योजना द्राक्ष शेतीच्या व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व गुण्यागोविंदाने भयमुक्त असा तालुक्यातील मतदारांना आपलासा वाटावा असा मतदारसंघ बनविणेसाठी मला साथ द्या. तालुक्यात शिरढोण,मळणगांव यासह इतर गावांमध्ये रोहित पाटील यांनी गावभेटी करत प्रचार दौरा केला.या गाव भेटीमध्ये महिला,युवक,ज्येष्ठ नागरिक,शेतकरी यांच्यासह ग्रामस्थ व मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी रोहित पाटील यांना महिलांनी औक्षण करून आशीर्वाद दिले.मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता रोहित दादा पाटील यांची प्रचारात मोठी आघाडी दिसत आहे. यावेळी कवठेमंकाळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.