प्रतिष्ठा न्यूज

तासगाव कवठे महांकाळ मतदार संघात 98.60% होम वोटिंग

प्रतिष्ठा न्यूज /किरण कुंभार
तासगाव : २८७- तासगांव कवठेमहांकाळ या विधानसभा मतदारसंघात वय वर्षे ८५ + व दिव्यांग मतदार यांचेकरीता भारत निवडणूक आयोगाने होम वोटींगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार या मतदारसंघात वय वर्षे ८५ + चे मतदार ४६८ व दिव्यांग १०५ मतदार असे एकूण ५७३ मतदार पात्र होते.त्यानुसार दि.०९/११/२०२४ व १०/११/२०२४ रोजी मतदार संघामध्ये होम वोटींग घेणेत आले.त्यामध्ये एकुण ५७३ मतदारांपैकी ५६५ मतदारांनी होम वोटींगचा लाभ घेतला आहे.व होम वोटींग ९८.६०% झाले आहे.उर्वरीत ८ मतदारापैकी ६ मतदार मयत असून २ मतदार अनुपस्थित राहीले आहेत,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.