माजी नगरसेविका स्नेहल सावंत आणि महेंद्र सावंत यांचा सुधीरदादांना पाठिंबा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.१०: सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना महापालिकेच्या प्रभाग १८ मधील माजी नगरसेविका स्नेहलताई सचिन सावंत आणि महेंद्र उर्फ बाळासाहेब सावंत यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. आज त्यांनी सुधीरदादांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला आणि या निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
बाळासाहेब सावंत म्हणाले, या निवडणुकीत सुधीरदादांना आम्ही पूर्ण पाठिंबा देणार आहोत. ते विजयी व्हावेत यासाठी काम करणार आहोत.
सुधीरदादा यांनी पाठिंब्याबद्दल आभार मानले. प्रभाग अठराच्या अधिक विकासासाठी आपण यापुढे कार्यरत राहू, असे आश्वासन दिले.