प्रतिष्ठा न्यूज

गेल्या दहा वर्षात तासगाव कवठे महांकाळ मतदार संघात विरोधकांना साधा दगडही हलवता आला नाही : सौ शिवानी पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव :केवळ गोड बोलून कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही तर त्याला विकास निधी खेचून आणण्याची चांगलीच धमक लागते असा टोला सौ शिवानी प्रभाकर पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील यांचे नाव न घेता लगावला.त्या घाटनांद्रे येथे तासगाव-कवठेमहंकाळ मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या प्रचार रॅली नंतर झालेल्या बैठकीत बोलत होत्या.यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की गेल्या दहा वर्षांत मतदार संघात विकास कामाचा साधा दगडही हलला नसुन हा रखडलेला विकास पुन्हा सुरू करण्यासाठी संजयकाकां पाटील यांच्या शिवाय पर्याय नसल्याचे सांगून महायुती पुन्हा सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहिण योजनेचे पंधराशे ऐवजी एकविशे रुपये केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून प्रचार रॅली काढण्यात आली.यावेळी त्यांनी मतदारांच्या गाठीभेटीही घेतल्या.यावेळी कवठेमहांकाळच्या माजी नगराध्यक्षा सौ सिंधुताई गावडे,नगरसेविका शीतल पाटील,सौ अंजली माने,तासगावच्या विजया पाटील,मयुरी पाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब उर्फ शंकर शिंदे,शिवसेनेच्या वैशाली मुदडे,संदेश लटके,दिलीप शिंदे,अमर घाटके,अभिजित शिंदे, शुभम शिंदे,बापूराव शिंदे,उमेश शिंदे,संतोष पाटीलसह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.