महाविकास आघाडीचे पृथ्वीराज पाटील यांनी परिवारासह मतदानाचा हक्क बजावला
प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.२०: सांगली विधानसभेसाठी आज उत्साहात मतदान संपन्न झाले. काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी जलभवन केंद्रावर पवित्र मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या बरोबर पत्नी सौ. विजया पाटील, पुत्र विरेंद्रसिंह, पुतणे ऋतुराज व प्रियांका ऋतुराज पाटील यांनीही मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात प्रौढ मताधिकाराची तरतूद करुन जनता सार्वभौम असल्याची कायदेशीर तरतूद करुन लोकशाहीला शाश्वत आयुष्य बहाल केले.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मतदारांचे किमान वय १८ वर्षावर आणून या लोकशाहीच्या उत्सवात तरुणाईला सहभागी करुन घेतल्याने मोठ्या प्रमाणात युवा वर्ग सांगलीत मतदानाला बाहेर पडत आहेत. युवा शक्ती परिवर्तन करुन रचनात्मक कामात चांगला सहभाग देत आहे याचा मला अभिमान व आनंद वाटत आहे. आज मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय. विधानसभा निवडणुकीत सांगलीकरांनी न चुकता मतदान करुन स्वातंत्र्य व लोकशाही वाचवण्यासाठी सहभागी व्हावे.’