सुधीरदादा गाडगीळ यांनी बजावला मतदानाचा हक्क
प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.२०: सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी सौ. मंजिरीताई गाडगीळ यांनी राजवाड्यातील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगली मतदार संघातील शहर तसेच ग्रामीण भागात ठिकठिकाणी मतदान केंद्राबाहेरील बूथ ना भेटी दिल्या. तेथील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली.
सांगली विधानसभा मतदारसंघातील सांगली शहरात तसेच मतदारसंघातील ग्रामीण भागात सकाळपासूनच अत्यंत उत्साहाने मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. गल्ल्या तसेच वेगवेगळ्या अपार्टमेंटमधील नागरिक मोठ्या प्रमाणात मतदान करीत होते. मतदानाचा वेग चांगला होता. मात्र काही मतदान केंद्रांवर एकेका बुथवरच अधिक मतदारांची नोंदणी असल्यामुळे तेथे मतदानासाठी वेळ लागत होता. तरीही अनेक मतदारांनी दोन दोन तास सुद्धा रांगेत उभे राहूनही मतदानाचा हक्क बजावला.