प्रतिष्ठा न्यूज

उसाने भरलेला चार चाकी ट्रेलर पलटी; मतदान पेट्या घेऊन निघालेली वाहने दोन तास खोळंबली

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर शेणवडे गावाजवळ रात्री नऊ वाजता डॉ. डी वाय पाटील साखर कारखान्याकडे ऊस भरून जात असलेला चार चाकी ट्रेलर जीप गाडी वर पलटी झाला. यामुळे जीप गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.ट्रॅक्टर पलटी झाल्यावर ट्रॅक्टर चालक पसार झाला.
जीप गाडी चालकाच्या म्हणण्यानुसार ट्रॅक्टर चालक मोठ्या आवाजात गाण्यांचा टेप लावून भरधाव वेगाने जात होता. अचानकपणे चार चाकी ट्रेलर जीप गाडी वर पलटी झाला.व एकच गोंधळ झाला. वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे मतदान झाल्यानंतर पेट्या घेऊन निघालेली वाहने सुमारे दोन तास अडकून पडली, पोलिसांनी येऊन वाहतूक सुरळीत केली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!