प्रतिष्ठा न्यूज

“काव्यात्मा”काव्य जागर संमेलन चिखलीत उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
पिंपरी चिंचवड: दि.१७ , रविवार रोजी विश्वरत्न इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे काव्यात्मा सन्मान सोहळा व काव्य जागर संमेलन चिखली येथे शानदारपणे पार पडले यावेळी व्यासपीठावर कामगार भुषण पुरुषोत्तम सदाफुले, जेष्ठ साहित्यिक महावीर पांढरे, वृक्ष मित्र विष्णू वाघ ,कवी बा .ह .मगदूम आणि विश्वरत्न इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल चे संस्थापक व्यंकटराव वाघमोडे होते .
प्रामाणिकपणा आणि निष्ठेने काम केल्यास तळागाळातील लोकांच्या जीवनात आनंद पेरता येतो म्हणूनच समाजात आदर्श निर्माण करणार व्यक्तिमत्व रिक्षावाले दादाभाऊ ओव्हाळ यांनी काही महिन्यांपूर्वी दुपारी घरी आल्यावर रिक्षात एक बॅग कुणी तरी विसरल्या चे लक्षात आले.ती बॅग उघडून पाहिली तर त्या बॅगेत तीन लाख रोख रक्कम आणि तितकेच दागिने दिसून आले, दादाभाऊ नी त्यांची पत्नी आणि मेव्हण्याला घेऊन देवाची आळंदी गाठून विवाह स्थळ शोधून काढले आणि तीन लाख रोख रक्कम आणि तिन लाखाचे दागिने असा ऐवज त्यांना परत केला तेव्हाच मंडपात सनई चौघडा वाजू लागला ,दोन मुलींचा संसार उध्वस्त होण्यापासून वाचवला असा आदर्श दादाभाऊ नी समाजासमोर ठेवला म्हणून दादाभाऊ ओव्हाळ यांना” काव्यात्मा आदर्श नागरिक पुरस्कार” देऊन सन्मानित केले.ज्या माऊलीने आयुष्य सुंदर करण्यासाठी स्वतः पतीला साक्षर करुन मुलांच्या शिक्षणासाठी कुठल्याही लग्न समारंभाला गेले नाहीत कारण जवळ पैसा नव्हता आणि आयुष्याचं सोनं करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून या माऊलीने स्वतःच्या पतीला साक्षर केले आणि याचं इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी मुला, मुली ना उच्च शिक्षण देऊन आज त्यांच्या मुलांच्या दोन कंपन्या आहेत,आजही त्यांची मुले आईच्या विचारांना मान देतात ती माऊली म्हणजे राधाताई रामचंद्र वाघमारे यांना “काव्यात्मा आदर्श माता पुरस्कार”देऊन सन्मानित करण्यात आले.ज्या माणसाच्या ताटात एकच भाकर आणि त्यातली चतकोर भाकर काढून समोरच्याची भुक भागविणारा माणूस तोच आत्मा शांत करतो तेव्हा लक्षात येते देव मंदिरात नाही आत्मा माणसात असतो. दिवसभर मिळेल ते सुतार काम करुन कुटुंबाचा गाडा उदरनिर्वाह करणार हे व्यक्तिमत्त्व रोजच्या मिळणाऱ्या कामाच्या पैशातून काही रक्कम बाजूला साठवून “गावगाडा” या संस्थेच्या माध्यमातून साहित्यिकांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करणाऱ्या सोमनाथ टकले यांना ” काव्यात्मा साहित्य सेवा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारर्थीच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत म्हणाले, तळागाळातील क्षेत्रात जाऊन फळाची अपेक्षा न करता काम करणाऱ्या व्यक्तीमत्वांना विश्वास देण्याचे कार्य काव्यात्मा साहित्य परिषद करत आहे म्हणून साहित्य संस्कृतीचा खराखुरा “आत्मा” आहे आणि ही चळवळ पुढे चालवण्याचे कार्य करत आहे .शाळेतील मुलांनी खुप छान कवितेचे सादरीकरण करुन मनमुराद आनंद लुटला आणि रसिकांची वाहवा मिळवली असेही सदाफुले यांनी पुष्टी जोडली. तो आनंद संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव वाघमोडे सरांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना पाहिला.
राज्यातील विविध भागातून आलेल्या कवीनी आपल्या उत्तमोत्तम कवितेचे सादरीकरण करुन रसिकांना मंत्रमुग्ध करुन सोडले , आपल्या कविते बरोबर इतर कवीच्या कविता ऐकण्याचा आनंद सर्व कवींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता कारण कुठलाही कवी अधून मधून उठून घरी गेला नाही हिच काव्यात्मा साहित्य परिषदेच्या कामाची पावती मान्यवराच्याही चेहऱ्यावर आनंद फुलवून गेली. ८१ वय असलेले तरुण जेष्ठ व्यक्तीमत्व साहित्यिक महावीर पांढरे यांनी जवळपास पाच तास खुर्चीवर बसून काव्य जागर संमेलनाचा आनंद घेतला हि जमेची बाजू या संमेलनात उठून दिसली.
यात बालकवी शिवम तेलघाणे ,रितीका घोडके, आम्रपाली शर्मा,पलक सिंग,साक्षी विश्वकर्मा, वैदेही वाघमोडे, अर्चना पोतदार आणि यश रवी चव्हाण आणि इतर बाल कवींनी कविता सादर करुन आऩंदात भर घातली.
सुख हे दु:खावरील उत्तम टाॅनिक आहे आणि याचं टाॅनिकचे उत्पादन आमच्या कवी , कवयित्री मित्रानी निर्माण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध करुन सोडले यात कवी सुरेश वाकचौरे, मच्छिंद्र झुरंगे,संजय देशमुख, व्यंकटेश देशमुख,उमेंद्र बिसेन ,विजय जाधव, विजय वडवेराव,नितीन भोसले, विष्णू वाघ, कवयित्री महेमुदा शेख,काळुराम ऐळवंडे पाटील, प्रतिमा काळे,वसंत घाग,सागर वाघमारे, अशोक वाघमारे, अशोक मोहिते, जयवंत पवार,अनिल नाटेकर, शोभाताई जोशी, आय के शेख,राजू जाधव, धनंजय इंगळे, देवेंद्र गावंडे, अरुण घोडके,सुनिता घोडके, राहुल भोसले, वंदना खोत,फुलवती जगताप,आनंद गायकवाड जयश्री श्रीखंडे, आनंदराव मुळूक, प्रकाश गायकवाड, जेष्ठ कवी अंगवणे, निलावती सावंत,रशिद आतार,वामन सुर्यवंशी, एकनाथ उगले, प्रशांत पाटोळे, जनार्धन भोसले आणि राजेश चौधरी इत्यादी जवळपास ६० कवींनी काव्य जागर संमेलनात सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी अनिल नाटेकर , देवेंद्र गावंडे,अनिकेत गावडे ,महेश क्षिरसागर, सुरेखा हारे व शाळेतील लहान लहान बालकांनी केलेली मदत विसरता येणार नाही.उद्याची पिढी सक्षम घडवण्यासाठी संस्कार देण्याचे कार्य वाघमोडे सर आणि त्यांचा शिक्षक स्टाफ करत आहे हेच यातून निष्पन्न झाले.उपस्थित कवींनी केलेल्या सादरीकरणातून ग दि मा पुरस्कारासाठी निवड करणार असल्याचे जाहीर करुन जयश्री श्रीखंडे यांनी त्यांचा रिपोर्ट कामगार भुषण पुरुषोत्तम सदाफुले यांच्याकडे सोपवला आहे अशी माहिती जयश्रीताईनी दिली. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद अध्यक्ष सदाफुले विजेत्यांना स्वतःहून कळवतील अशी माहिती कळून आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू वाघ यांनी केले . दिनेश भोसले आणि आत्माराम हारे या दोघांनी मिळून उत्तम निवेदन केले आणि संस्थेचे उपाध्यक्ष संजय साळुंखे यांनी आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.