खाडे दांपत्याचा मुलाच्या वाढदिनी स्तुत्य उपक्रम;१६०० मुलांची नियमित आरोग्य तपासणी
प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : भाजप युवा नेते सुशांतदादा खाडे व खाडे शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा स्वातीताई खाडे या दांपत्याने आपला मुलगा श्लोक याचा ९ वा वाढदिवस खाडे शैक्षणिक संकुलाच्या १६०० मुलांची नियमित आरोग्य तपासणी करत अत्यंत वेगळ्या व साध्या पद्धतीने साजरा केला. या आरोग्य तपासणीचे नियोजन प्रतिवर्षी श्लोक च्या वाढदिवसानिमित्त खाडे संकुलामध्ये करण्यात येते. यावर्षीही याच पद्धतीने नियोजन करण्यात आले. यासाठी विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान बामणोली व रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी यांचे सहकार्य लाभले. या शिबिरामध्ये मुलांच्या केलेल्या तपासणीमुळे त्यांना भविष्यात होणाऱ्या आजाराविषयी तसेच माहिती मिळाली. तसेच त्यासाठी लागणारे उपचारही मोफत अथवा कमी खर्चात करणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान मार्फत संस्था प्रमुख डॉक्टर राम लाडे, संचालक मंदार बन्ने, स्वाती मॅडम, श्रीकांत वायदंडे, स्वप्नाली कोटला, अश्विनी गोपी, स्नेहल मोहिते आणि नर्सिंग इन्स्टिट्यूटचे ६० विद्यार्थी . तसेच रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी मार्फत शशिकांत चौगुले, प्रेमराज जाजू , विष्णु शिंदे, स्वप्निल पाटील आणि डॉक्टर रतन पाटील यांनी सहभाग नोंदवला.
या शिबिरासाठी स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील, सायली कुलकर्णी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.