प्रतिष्ठा न्यूज

मतदान जनजागृतीसाठी सांगलीच्या तरुणाचा १४० किमी सायकल प्रवास 

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे 
सांगली : मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासन तसेच अनेक सामाजिक संस्था विविध उपक्रम तळमळीने राबवत असतात. या दिवसाचे गांभीर्य नसलेले लोकही आपणाला पाहवयास मिळतात. परंतु सांगलीतील ऋषिन जोशी या आरोग्यप्रेमी युवकाने १४० किमी सायकल चालवत जाऊन आपल्या मूळ घानवड या गावी  मतदान केले. तसेच रस्त्यावर भेटणाऱ्या सर्व लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या सायकलीला मतदान जागृतीचा संदेश फलक लावला होता.
          सांगलीतील आर. जोशी’ज बॅडमिंटन अकॅडेमीचे प्रमुख प्रशिक्षक असून, गेले अनेक वर्षे ते हा उपक्रम राबवत आहेत. या प्रवासात भेटनाऱ्या अनेकांना आपल्या आयुष्यातील मतदानाचे व आरोग्याचे महत्व समजावून सांगत असतात. “लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा आणि आयुष्य बळकट करण्यासाठी व्यायाम करा” असा संदेश याद्वारे ते देतात.  या उपक्रमाला अजित कुलकर्णी, विजय खेत्रे, प्रा.विजय कोळेकर, संतोष कुकरेजा अशा मित्र परिवाराचे प्रोत्साहन मिळते आहे. जोशी यांच्या या उपक्रमाचे  सर्वांकडून कौतुक होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.