तासगाव कवठे महांकाळ!महिलांच्या मतदानाचा वाढला टक्का,कोणाचा विजय पक्का
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले.या निवडणुकीत नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत मतदानाचा नवा विक्रम केल्याचें दिसत आहे.यात सर्वात महत्वाचं म्हणजे महिला मतदारांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसत आहे.तासगाव कवठे महांकाळ मतदार संघात या निवडणुकीत महिलांच्या मतदानाचे प्रमाण जवळपास 5 टक्क्यांनी वाढले असल्याचे दिसत आहे.त्यामुळे मतदार संघात सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार?याचा निकाल लाडक्या बहिणींच्याच हातात असल्याचे स्पष्ट झाले आहे.महिलांच्या या वाढत्या मतदानाचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होईल असंही बोललं जात आहे.विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे अंतिम आकडे समोर आले असून,मागील वेळच्या तुलनेत तासगाव कवठे महांकाळ मध्ये ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानात सुमारे 7 टक्क्यांची वाढ झाली आहे.यात महिला मात्र कमालीच्या जागरूक झाल्याचे दिसून येत आहे.मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत महिलांचे मतदान निश्चितच वाढले आहे.या मतदान वाढवलेल्या लाडक्या बहिणींचा महायुतीला फायदा होणार की महाविकास आघाडीला याबाबत विविध तर्क वितर्क वर्तविण्यात येत आहेत.तालुक्यात पहिल्यांदाच महिलांनी एवढ्या मोठया प्रमाणावर मतदान केल्याने तासगाव कवठे महांकाळ मतदार संघाचा आमदार महिलाच ठरवतील अशी चर्चा तालुक्यात सुरु आहे.