एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत? वैद्यकीय मदत झालेल्या रुग्णांकडून तासगावच्या श्री गणरायाला साकडे
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ही योजना राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय महत्वाकांक्षी योजना झाली.” ना वशिला – ना ओळख,थेट मिळते मदत ” हे या कक्षाचे कृतीयुक्त ब्रीदवाक्य ठरले.जात-धर्म-पंथ-पक्ष विरहीत अशाप्रकारे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीने आपली कार्यपद्धती ठेवली आहे.म्हणूनच राज्यातील सर्व प्रमुख नेतेमंडळी,लोकप्रतिनिधी ( आमदार / खासदार ) या कक्षाच्या कार्याविषयी भरभरुन व्यक्त होतानाच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.आपल्या जवळ आलेला रुग्ण हा फक्त रुग्ण आहे त्याचा जीव वाचलाच पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कक्षा कडून मदत करण्यात आली आहे.राज्यात दोन वर्षे चार महिन्यात 51 हजार रुग्णांना जीवनदान देत 361 कोटी रुपयाचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी गरजूना मिळाला आहे.याच कक्षाच्या माध्यमातून तासगाव कवठे महांकाळ तालुक्यातील शेकडो रुग्णांना लाभ मिळाला असून,यातून अनेकांचे प्राण वाचले आहेत.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मा.एकनाथ शिंदे यांना राज्यात घवघवीत यश मिळाले असून,अशा देवदूतासमान असणारे साहेब पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे यासाठी ढवळी येथील एका रुग्णाच्या नातेवाईकाने तासगावच्या श्री गणरायाला त्यांच्या नावाने अभिषेक घालून साकडे घातले आहे.तालुक्यातील ज्या ज्या गावातील रुग्णांना मदत झाली आहे त्या सर्वच रुग्णांनी आपापल्या ग्राम दैवताला साकडे घातल्याचे वैद्यकीय मदत कक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष सचिन शेटे यांनी सांगितले आहे.