जिजाऊंच्या रणरागिनींनी- जागर सोहळ्यामध्ये सहभागी व्हा : सौ प्रणिती पवार
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : 21 व्या शतकातील आधुनिक महिला मा जिजाऊ साहेब यांचा आदर्श घेऊन धावपळीच्या व स्पर्धेच्या युगामध्ये हिरकणी प्रमाणे आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत आहेत. या गोष्टीचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून सांगली जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सांगलीमध्ये सातव्ये राज्यस्तरीय अधिवेशन ३० नोव्हेंबर व ०१ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. जिजाऊंच्या रणरागिनींनी- या जागर सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या सांगली जिल्हा अध्यक्ष सौ. प्रणिती पवार यांनी केले आहे.
यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, संविधानातील स्त्री सक्षमीकरण, बदलती विवाह पद्धती आणि सामाजिक भान, कुटुंबातील स्त्री व अर्थकारण, अशा अनेक विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून अश्विनीताई घोरपडे पुणे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वंशज व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या , अध्यक्षा शिवमती सीमाताई बोके प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र, स्वागताध्यक्ष शिवमती स्वप्नाली ताई विश्वजीत कदम असणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहलता खेडकर, विजयाताई पाटील, पूजा पाटील, प्रियंका देवी घोरपडे, राजश्री तांबेकर, अर्चना थोरात, रेखा सूर्यवंशी, मनीषा पाटील सुवर्णाताई गोविलकर, डॉ अर्चना थोरात इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अशी माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा प्रणिता पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी उपाध्यक्ष पूजा पाटील, कार्याध्यक्ष जयश्री घोरपडे, सचिव ज्योती सावंत, मानसी भोसले, अर्पणा खांडेकर, अशा पाटील, सुप्रिया घर्गे, जानवी पाटील, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी अध्यक्षा रेखा पाटील, विजया हरुगडे, मृणाल पवार,शितल मोरे इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.