नागरिकांनी संविधानिक मुल्ये जपावीत – प्राचार्य डॉ. टी एम.पाटील
प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना संविधान समजून घेणे, त्यानुसार आचरण करणे, त्यातील मूल्ये जपणे हे नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. असे मत आनंदी महाविद्यालय, गगनबावडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .टी. एम.पाटील यांनी व्यक्त केले. ते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या संविधान दिवस कार्यक्रमात बोलत होते .
सविस्तर माहिती देत त्यांनी संविधानाने दिलेल्या हक्क आणि कर्तव्य याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.आदिनाथ कांबळे यांनी केले. संविधानाच्या प्रास्ताविकेची उद्घोषणा प्रा. ए.सी.कुंभार यांनी करून सामूहिक वाचन झाले. प्रथम संविधान उद्देशिकेला प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर कार्यक्रमास संस्थेचे प्रा. अध्यक्ष सतीश देसाई, सचिव डॉ .विद्या देसाई यांचे प्रोत्साहन लाभले. आभार प्रा. सौरभ देसाई. यांनी मानले.
यावेळी प्रा. डी. एन. सोनकांबळे प्रा. सुप्रिया घाटगे प्रा.आसमा जमादार विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.