सांगलीत भाजपच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष, भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा व महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्यावतीने सांगलीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यानिमित्ताने सांगलीतील
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला
बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या अध्यक्षा
स्नेहलताई सावंत आणि सिद्धार्थ गाडगीळ यांनी पुष्पहार घालून सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सर्वांना जगण्याचा समानतेचा हक्क देणारा महान ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संविधानाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेला कळावे या उद्देशाने संपूर्ण देशामध्ये संविधान दिन साजरा करण्याचा एक चांगला उपक्रम चालू केला आहे. असे मत यावेळी बोलताना सर्वांनी व्यक्त केले. यावेळी भाजप व महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.