येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : तब्बल ५१ बॉटल रक्तसंकलन
प्रतिष्ठा न्यूज
येळावी प्रतिनिधी : तासगाव तालुक्यातील येळावी येथे शहीद दिनानिमित्त व जिल्ह्यात असलेला रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदान शिबिर आयोजित केले होते. सदर शिबिरामध्ये ५१ बॉटल रक्त संकलन करण्यात आले. रक्त संकलन आदर्श ब्लड बँक सांगली यांनी केले.सगळीकडे रक्ताचा तुटवडा असल्याने रुग्णालयात प्रसूती मध्ये किंवा नवजात बालकाला ही रक्ताची आवश्यकता असते. अलीकडे डेंगू सह अनेक प्रकारच्या वायरल चा शिरकाव झाल्याने अनेकांना रक्तातील घटकाची गरज भासत आहे. ही बाब लक्षात घेऊन येळावीतील युवक शुभम पाटील यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले असता या शिबिरास युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.ते वर्षातून दोन वेळा अशा शिबिराचे आयोजन करतात आणि त्यातून परिसरातील गरजू रुग्णांना मोफत रक्त पुरवण्याचे कार्य त्याच्या माध्यमातून केले जाते.ते संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून दरवेळी मानवतेच्या कार्यात युवकांना समाविष्ट करून घेतात.सदर शिबिरास प्रदीप (हरी) पाटील,ओंकार गावडे,रोहित पाटील,ओंकार कुंभार,दीपक चव्हाण,अमित पाटील यांचे सहकार्य लाभले.