संविधान भारताचा गौरव : न्या.डॉ आर एस कुळकर्णी
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : आज संविधानाला ७५ वर्ष पुर्ण होत आहेत,अनेक स्थित्यांतरांना हे संविधान पुरुन उरलं आहे, भारताला एकसंध आणि सदृढ राष्ट्र बनविण्यामध्ये संविधान कळीची भुमिका बजावत असून संविधाना मुळेच भारताला उज्जवल भविष्य आहे असे प्रतिपादन न्या.डॉ आर एस कुळकर्णी यांनी संविधानाच्या अमृत माेहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित महाराष्ट्ररत्न वि स पागे महाविद्यालय तासगाव येथे केले.या कार्यक्रमासाठी संस्था संचालक ॲड सुनिल महामुनी, ए पी आय आर पी यादव व प्राचार्य सुभाष सानप उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवातीस प्राचार्य श्री सुभाष सानप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.त्यांनतर श्री आलमशहा मोहंमद यांनी वाहतूक नियम व संरक्षण हा विषय मांडताना भारतात होणारे रस्ते अपघात, त्यामध्ये होणारे मृत्यु यांची आकडेवारी मांडत तरुणांनी वाहन चालविताना कशी काळजी घ्यावी याचे सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर श्री आर पी यादव यांनी संविधान प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कसा आहे हे सांगत वाहतुक नियंत्रण व त्यांचे वेगवेगळे इंडीकेटर्स यांचे प्रात्यक्षिकासहीत अर्थ स्पष्ट करुन सांगितले.न्या कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संविधान नेमकं कसं तयार झालं,ते तयार करताना वेगवेगळया देशांच्या राज्यघटनांचा कशा प्रकारे आधार घेतला गेला, त्यासोबतच त्यामधील महत्वाच्या तरतुदी,घटनादुरुस्ती कशी होते, संविधान तयार करताना आलेल्या अडचणी व त्यावरील डॉ बाबासाहेबांची भूमिका,संविधानात आपले हक्क-अधिकार-कर्तव्ये कशा पध्दतीने सांगितले आहेत आपण सजग नागरिक म्हणून त्यांच्या अंमलबजावणीसाठी काय काय करु शकतो याची अत्यंत खुमासदार पध्दतीने त्यांनी मांडणी केली.अध्यक्षीय भाषणात ॲड महामुनी यांनी संविधानातील उद्देशिकेचे वाचन करत त्यामधील प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितला.कार्यक्रमाचे आभार श्री सानप सर यांनी मानले.आयोजन तालुका विधी सेवा समिती तासगाव यांनी केले.