तासगाव अर्बन बँकेच्या सांगलीतील मार्केट यार्ड शाखेत चोरीचा प्रयत्न करणारे सराईत आरोपी जेरबंद
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : तासगाव अर्बन बँकेच्या सांगलीतील मार्केट यार्ड शाखेत चोरीचा प्रयत्न करणारे सराईत आरोपी जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली.
ओंकार विशाल साळुंखे वय १९ वर्ष रा.राजीव गांधी झोपडपट्टी. जुना बुधगांव रोड सांगली यास अटक करण्यात आली असून सुदर्शन यादव, रा कराड, जि सातारा, सध्या रा विश्रामबाग, सांगली व मुनीब ऊर्फ बाबु भाटकर, रा आंबा चौक, सांगली हे दोघे फरार आहेत.
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत*
दिनांक २७/११/२०२४ रोजी तासगाव अर्बन को ऑपरेटीव्ह बँक शाखा, मार्केट यार्ड सांगली या बँकेमध्ये अज्ञात ०३ इसमांनी बँकेचा कडी कोयडा तोडून बँकेत आत प्रवेश करून बँकेतील कॅशियर रूमचे शटर उचकटून बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला असून त्या अनुषंगाने वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे व मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना गुन्हा उघडकिस आणणेबाबत आदेश दिले. सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांचे पथकामधील पोहवा । अनिल कोळेकर व पोशि विक्रम खोत यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सुदर्शन यादव रा. विश्रामबाग, सांगली व त्याचे सहकारी ओंकार साळुंखे रा. राजीव गांधी झोपडपट्टी, जुना बुधगांव रोड सांगली व मुनीब ऊर्फ बाबु मुश्ताक भाटकर सध्या रा. अंबा चौक, सांगली यानी तासगाव अर्बन को ऑपरेटीव्ह बँक शाखा, मार्केट यार्ड, सांगली येथे चोरी करण्याचा गुन्हा करून ते तिघे सध्या तात्यासाहेब मळा, मिरा हौसींग सोसायटी, सांगली परीसरात लपून बसल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
नमुद पथकास मिळाले बातमीप्रमाणे, सांगली ख्वाजा बस्ती सहयाद्रीनगर, टिंबर एरीया मार्गे मिरा हौसीग समोर दाखल होऊन वाहन तात्यासाहेब मळा येथे अलीकडे थांबवून पायी चालत वाँच करीत जात असताना निकुंज लॉनचे समोरील बाजुस असले भिंतीलगत रस्त्याचे उजवे बाजुस अंगात काळ्या रंगाचा शर्ट व पाठीवर निळसर रंगाची सॅक असलेला एक तरूण इसम बातमीप्रमाणे थांबलेला दिसलातसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने शिताफिने त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नावे ओंकार विशाल साळुंखे वय १९ वर्ष रा. राजीव गांधी झोपडपट्टी जुना बुधगांव रोड, सांगली असे सांगितले. त्याचेकडील असलेल्या सॅकमध्ये प्रहिले असता त्यामध्ये एक लाकडी मुठीचा धारदार कोयता, कटावणी, एक प्लास्टीक मुटीचा धारदार चॉपर चाकू व मारतुल मिळून आले. त्यास सदर वस्तूबाबत विचारले असता त्याने सांगितले की, या वस्तूने त्याचे साथीदार सुदर्शन यादव व मुनीब ऊर्फ बाबु भाटकर यांचेसोबत रात्रीच्या वेळी मार्केट यार्ड सांगली येथील बँकेचे कुलूप कटवाणीने तोडुन आत प्रवेश करून चोरी करत असता बँकेचा सायरन वाजल्याने ते पळुन गेले व त्यानंतर मल्टीप्लेक्स टॉकीजच्या पाठीमागील कॉलनीमध्ये बंद घर फोडून चांदीचे साहीत्य चोरी केल्याची कबुली दिली आहे
लागलीच सदर आरोपी यास सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांनी ताब्यात घेवून नमूद मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून आरोपी व मुद्देमालसह विश्रामबाग, पोलीस ठाणेस वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत.
सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांचे वर यापूर्वी सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, मिरज ग्रामीण व कराड, जि सातारा या ठिकाणी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
तसेच परागंदा आरोपी नामे सुदर्शन यादव, रा कराड, जि सातारा, सांगली व मुनीब ऊर्फ बाबु भाटकर, रा आंबा चौक, सांगली यांचा शोध घेवून आणखी गुन्हे उघडकिस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत.
*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, यांचे मार्गर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था.गु.अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था.गु.अ. शाखा, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोहेकॉ/ संदिप गुरव, नागेश खरात, द-याप्पा बंडगर, अनिल कोळेकर, पोहेका / सतीश माने, सागर लवटे, सागर टिंगरे, अमर नरळे पोना/ सुशिल मस्के, संदिप नलावडे, पो.कॉ/ विक्रम खोत, सुरज थोरात, सुमित सुर्यवंशी पो.कॉ./ कॅप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे