आर्य अबॅकस अँड वैदिक मॅथ्स यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय अबॅकस स्पर्धा उत्साहात संपन्न
प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : आर्य अबॅकस अँड वैदिक मॅथ्स यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय अबॅकस स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. धनंजय गार्डन सांगली येथे राज्य स्तरीय अबॅकस स्पर्धा पर पडली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातून सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, वाशी, ठाणे, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यातून सुमारे ८५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये सर्वात कमी वेळेत म्हणजेच २.३५ सेकंद मध्ये १०० गणित सोडवून १०० पैकी १०० मार्क मिळवलेले विद्यार्थी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन म्हणून घोषित करण्यात आले. अशा स्पर्धकांना संस्थेमार्फत आकर्षक सायकल व चॅम्पियन झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच बक्षीस देण्यात आले आहे.
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे वाळवा – जोया शरीफ तांबोळी, बेडग -विराट निलेश घोरपडे, कडेगाव- रितेश भानुदास पाटील, बेडग- तोहा इरफान शेख,पुणे – मंगेश शिवाजी कदम, कवलापूर – अन्विषा अनिल भोसले, बुधगाव- विराज विकास शिंदे, कवलापूर- संचिता सचिन माळी, बुधगाव -अर्पिता चेतन परदेशी, बेडग -वेदांत वसंत मुळे,नागठाणे -स्वराली वैभव साळुंखे,वाळवा- प्रांजल संपतराव पाटील, नागाव -धवल दिग्विजय पाटील,कराड- साकिब मुजावर इत्यादी
यासाठी समीर गायकवाड संस्थापक नशाबंदी मंडळ सांगली जिल्हा, शर्वरी ताई पवार संस्थापक अध्यक्ष दुर्गा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य संपादक संचालिका तिचा जागर न्यूज, महेश गस्ते, पोलीस उपनिरीक्षक (PSI), आकाश कोळी सॉफ्टवेअर डिझायनर, रमा कौलगुड प्रोफेसर अण्णासाहेब डांगे कॉलेज आष्टा, डॉ.अरुण सरडे आयर्न मॅन, डॉ.संतोष सावंत शिवकृपा हॉस्पिटल आष्टा,अमोल चौगुले अध्यक्ष सायकल क्लब आष्टा,शंकर मोहिते इंटरनॅशनल मॅरेथॉन आर्य अबॅकस आणि वैदिक मॅथ्स असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष विवेक संकपाळ, उपाध्यक्ष योगेश शिनगारे, सेक्रेटरी अमित पोळ, खजिनदार अर्चना संकपाळ या सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.