मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मंगळवारी आरोग्य तपासणी शिबिर ; व्याधी कळवा, तज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने परिषदेचे मार्गदर्शक एस एम देशमुख सर यांच्या आदेशाप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे आपण आरोग्य तपासणी शिबिर घेत आहोत. मात्र यंदाची शिबिर इतर शिबिरापेक्षा वेगळे आहे. *मंगळवार ३ डिसेंबर सकाळी ८ ते १२ स्थळ – आय एम ए हॉल, आमराई क्लब शेजारी, सांगली*
रक्त तपासणी, डोळे, दात तपासणी, ख्यातनाम दवाखान्यांमध्ये मोफत उपचार, ज्येष्ठांसाठी मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया मोफत, महिला व मुलांची स्वतंत्र तपासणी, उपचार, या शिबिरात तपासणीनंतर आपल्याला आवश्यक असणाऱ्या कुठल्याही मोठ्या दवाखान्यात मोफत उपचारासाठी मराठी पत्रकार परिषद आणि सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाची टीम आपणा सहकार्य करेल.
3 डिसेंबर रोजी सांगलीत आणि आठवड्याभरात संपूर्ण जिल्ह्यात तालुकावार आरोग्य शिबिरे होणार
तीन तारखेला सांगली मिरज आणि आसपासच्या परिसरातील पत्रकार, पत्रकारांचे कुटुंबीय, वृत्तपत्र कर्मचारी आणि वृत्तपत्र विक्रेते यांनी सहकुटुंब येऊन या शिबिराचा लाभ घ्यावा.
पहिले शिबिर -मंगळवार ३ डिसेंबर सकाळी ८ ते १२
स्थळ – आय एम ए हॉल, आमराई क्लब शेजारी, सांगली
सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती सागली जिल्हा मराठी पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
सुदर्शन आय हॉस्पिटल आणि अनुराधा हॉस्पिटल अशा दोन मोठ्या डोळ्यांच्या दवाखान्यांमध्ये मोफत उपचाराची व्यवस्था केली आहे. डॉक्टर मुजावर यांच्याकडे हार्टची, सेवासदन, उषःकाल अशा मल्टीस्पेशालिटी, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोफत उपचाराची सोय आपण करत आहोत. त्यामुळे कोणीही ही आरोग्य शिबिरे चुकवू नयेत.