५१ वी कुमारी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आरग येथे संपन्न
प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज: सांगली जिल्हा कब्बडी असो. सांगली व प्रोग्रेस कबड्डी क्लब आरग आयोजित ५१ कुमारी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२४ जि. प. शाळा नं १ आरग ता. मिरज येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्थेच्या अध्यक्षा स्वाती सुशांत खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खाडे यांनी खेळाडूंना उद्देशून स्पर्धा या आपला खेळ विकसित करण्यासाठी असतात असे प्रतिपादन केले. तसेच निवड होणाऱ्यांनी पुढील स्पर्धेसाठी तयारी करावी तर ज्यांची निवड होणार नाही त्यांनी खचून न जाता आपल्यातील उनीवांचा अभ्यास करून जोमाने कामाला लागावे असेही सांगितले.
या निवड चाचणीच्या स्पर्धेसाठी सांगली जिल्यातील १९ कुमारी मुलींच्या संघानीं सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रथम क्रमांक प्रोग्रस कबड्डी क्लब, आरग, द्वितीय क्रमांक शिवाजी व्यायाम मंडळ, वाळवा तर तृतीय क्रमांक तरुण भारत मंडळ, सांगली या संघानी मिळवाला. या स्पर्धेतून सांगली जिल्हा संघ निवडला जाणार असून पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वातीताई सुशांत खाडे अध्यक्षा दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था, रामभाऊ घोडके अध्यक्ष सांगली जिल्हा कबड्डी असो. नितीन (काका) शिंदे कार्यवाहक सांगली जिल्हा कबड्डी असो. दिनकर (तात्या) पाटील कार्यकारी अध्यक्ष सांगली जिल्हा कबड्डी असो. आदि उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये सागर वडगावे, किरण (दादा) पाटील, मीनाक्षी वसंत कोरबू, सरिताताई कोरबू, हरीभाऊ गावडे, तुकाराम गायकवाड, सोमनाथ चौगुले, संभाजी पाटील आदि मान्यवर व्यक्ती होत्या.