अखेर निमणीचें शिक्षक अविनाश गुरव यांचे निलंबन… दलित महासंघाच्या प्रशांत केदार यांच्या तक्रारिला यश
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तालुक्यातील निमणी (शिवाजीनगर) येथील जिल्हा परिषद शाळेत अनधिकृत शिक्षक नेमणूक प्रकरणी ‘त्या’ शाळेचे शिक्षक अविनाश गुरव यांचे सह दोन अन्य शिक्षक निलंबित व शाळा व्यवस्थापन समितीला खुलासा नोटीस दिल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांनी दलित महासंघ (मोहिते गट) जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांच्या तक्रारीची दखल घेऊन मोठी कारवाई केली आहे.शिक्षक अविनाश गुरव यांचाबाबत दलित महासंघ (मोहिते गट) जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी शिक्षण आयुक्त,मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचेकडे तक्रार देऊन निलंबन मागणी केली होती.सदर तक्रारी नंतर नेमलेल्या चौकशी अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचेकडे अहवाल सादर केल्यानंतर गुरव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी पॅट परीक्षा दरम्यान,निमणी (शिवाजीनगर) येथील शाळेस भेट दिली होती. यावेळी,त्या शाळेतील शिक्षक अविनाश गुरव हे गैरहजर असल्याचे व उशिरा शाळेत आल्याचे निदर्शनास आले तर,त्या ठिकाणी शिकवत असलेली महिला शिक्षिका अनधिकृतपणे गुरव यांनी नेमल्या असल्याचे स्पष्ट झाले होते.याची दखल घेवून गायकवाड यांनी गुरव यांना स्वयंमस्पष्ट खुलासा मागितला होता.याची दखल प्रसारमाध्यम व संघटनांनी घेतली.दलित महासंघ जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी शिक्षणाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,व शिक्षण आयुक्तांकडे संबंधित शिक्षकाची तक्रार देऊन चौकशीसह बडतर्फ मागणी केली आहे.आज रोजी शिक्षक अविनाश गुरव यांचा चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर करण्यात आला आहे.तेंव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशाने शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी शिक्षक अविनाश गुरव यांचे सह इतरांवर कारवाई केली आहे.