प्रतिष्ठा न्यूज

मुंबईतील शपथविधी सोहळ्यानंतर सांगलीत भाजपचा जल्लोष ; फटाक्यांची आतषबाजी, पेढ्यांचे वाटप, जोरदार घोषणाबाजी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.५ : महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे आज शपथ घेतली. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनीही शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या  या शपथविधी सोहळ्यानंतर सांगलीत भाजप कार्यालयासमोर तसेच शहरात ठीक ठिकाणी भाजप तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
शपथविधी सोहळ्याचे दृश्य दूरचित्रवाणीवरून प्रसारित होते.त्यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विश्रामबागमधील कार्यालयासमोर प्रचंड संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक जमले होते. त्यांनी शपथविधी सोहळा सुरू होताच फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. घोषणाबाजी केली आणि पेढ्यांचे वाटप केले.
आज विश्रामबागमधील सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर भाजप तसेच महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले होते. नागरिकांचीही मोठी उपस्थिती होती.प्रचंड उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यानंतर सर्वांनी भारतीय जनता  पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम जय श्रीराम अशाही घोषणा देण्यात आल्या.  नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश  बिरजे,  भाजपचे पदाधिकारी विश्वजीत पाटील, रामकृष्ण चितळे, केदार खाडीलकर, सुनील भोसले, रवींद्र बाबर, माधुरी वसगडेकर, प्रीती काळे, शैलजा पंडित, किरण  सर्जे, अरविंद कोरडे, रणजीत सावंत,चेतन माडगूळकर,जमीर कुरणे, प्रवीण कुलकर्णी, राजू पाटील, अनिकेत खिलारे, शांतिनाथ कर्वे, अमित गडदे,सारंग साळुंखे, रवींद्र  ढगे, सुभाष पाटील, विनय सहस्रबुद्धे, राजू मगदूम, अमित बसतवडे ,सुजित राऊत आदि उपस्थित होते.

*देवेंद्र फडणवीस राज्य समृद्ध, सुखी करतील: आमदार गाडगीळ*
शपथविधी सोहळ्यानंतर अत्यंत आनंदित झालेले आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रगतीपथावर असलेल्या राज्याला समृद्ध बनवतील. सुखी करतील. शेती, नागरी विकास, उद्योगधंदे, रोजगार निर्मिती यासह सर्व समाजांचे  कल्याण करण्यासाठी ते समर्थपणे काम करतील.
आमदार गाडगीळ म्हणाले, देवेंद्रजी यांच्याकडे राजकीय आणि प्रशासकीय कौशल्य आहे. सर्वोच्च पदाचा दीर्घकाळ अनुभव आहे. त्याचबरोबर समाजातील तळागाळातील आणि उपेक्षित वर्गाबद्दल आपुलकी आणि आस्था आहे.  एकविसाव्या शतकासाठी आवश्यक असलेले व्हिजनही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य त्यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक अशी प्रगती करेल याची आम्हाला खात्री आहे.

Related Articles