निमणी ग्रामपंचायतीत महापरीनिर्वाण दिन साजरा… सरपंच सौ.रेखा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : निमणी ग्रामपंचायतीत महापरिनिर्वाण दिना निमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार,संविधानाचे प्रणेते डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली.निमणीच्या सरपंच सौ.रेखा रविंद्र पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तत्पूर्वी समाज मंदिर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिननिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे फक्त घटनाकारच नव्हते तर अर्थतज्ञ,जलतज्ञ,शैक्षणिक क्षेत्रातील जेवढ्या उच्चविभूषित पदव्या होत्या तेवढ्या सगळ्या संपादन करणारे व अभूतपूर्व यश संपादन केलेले डाॅ बाबासाहेब अशी महान व्यक्ती पुढे शतकात होणे नाही असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.यावेळी निमणीचे उपसरपंच राजेंद्र घोडके,माजी पंचायत समिती सदस्य श्रीरंग देवकुळे,माजी उपसरपंच आर डी पाटील,पोलीस पाटील सतिश पाटील,शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सर्जेराव पाटील,ग्रामपंचायत सदस्य नामदेव जमदाडे,दिपक पाटील,सदस्या सौ.संगिता चौगुले,
सौ कल्पना सुखदेव,मुख्याध्यापक पी डी गुरव,ग्रामसेवक किरण जाधव,बटू कोळी,प्रशांत पवार,पंढरीनाथ काळीबाग,पांडुरंग सुखदेव, बाळासाहेब काळीबाग,युवराज सुखदेव,शशिकांत सुखदेव,निखिल सुखदेव, चैतन्य सुखदेव,विनोद देवकुळे,किरण देवकुळे,रोहित पवार, आकाश सुखदेव,सौ विद्या काळीबाग, सौ.मोहिनी वसुदेव,सौ रुपाली काळीबाग,सौ.संजया कांबळे,आदि उपस्थित होते.