प्रतिष्ठा न्यूज

तासगावात रोजगार हमीच्या कामात भ्रष्टाचार : अमोल काळे; चौकशी करून कारवाई करा, मनसेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तालुक्यात रोजगार हमी योजने अंतर्गत सावर्डे,दहिवडी, लोकरेवाडी,डोर्ली या गावांमध्ये रस्त्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मनसे नेते अमोल काळे यांनी केली आहे. यासंबंधी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.दिलेल्या निवेदनात त्यांनी तासगाव तालुक्यात रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या कामांमध्ये कुशल बिलामध्ये वाळू बिले विना परवाना आहेत.माहिती फलक लावणे बंधनकारक असताना कोणत्याही सार्वजनिक कामावरती माहिती फलक नाहीत परंतु वैयक्तिक कामात मात्र माहिती फलकाची विचारणा केली जाते.सार्वजनिक कामाचे अंदाजपत्रक हे रोजगार हमीच्या ६०-४० निकषानुसार नाहीत.कामावरती ऑनलाईन जी हजेरी घेतली जाते तिथे हजेरी वरती जे मजूर दिसतात ते प्रत्यक्षात नसून सर्व कामे मशनरीने करून घेतली जातात.तसेच मस्टरला ज्या मजुरांची नोंद आहे ते मजूर प्रत्यक्षात कामावर नसून त्याठिकाणी स्थानिक लोकांना उभ करून फोटो काढलेले दिसत आहेत व प्रत्येक कामावरती ठराविक २ ते ३ फोटो वारंवार वापरत असल्याचे दिसत आहे.हजेरी घेताना जुन्या फोटोवरून फोटो काढून हजेरी लावलेली दिसत आहे.सार्वजनिक कामांची दोन वेळा हजेरी घेणे बंधनकारक असतांना बऱ्याच कामावर एकच वेळ हजेरी घेतल्याचे दिसून येते.सदर कामांच्या कार्य आरंभ आदेशामधील अटींमध्ये असे नमूद आहे की सदर रोजगार हमीची कामे कोणत्याही कंत्राटदार किंवा यंत्राद्वारे करण्यात येऊ नयेत परंतु प्रत्यक्षात त्याचे पालन केले जात नाही.सामग्री वाहतूक म्हणजेच मुरूम,वाळू,खडी यांची वाहतूक करते वेळी सक्षम प्राधिकरणाचा वाहतूक परवाना घेणे आवश्यक आहे,परंतु सदर कामांमध्ये परवाना दिसून येत नाही.प्रत्यक्ष काम सुरु करताना शासन निर्णयातील तरतुदींचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे परंतु कुठेही नियमांचे व तरतुदींचे पालन केले जात नाही असे म्हंटले आहे.वरील सर्व मुद्दे पाहता अतिशय मोठ्या प्रमाणात सदर योजने अंतर्गत भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे. तरी सदर विषयाची सखोल चौकशी करून लवकरात लवकर संबंधितांवर कारवाई करावी,अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खळखट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला  आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.