विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवावे- उपायुक्त वैभव साबळे
प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : महानगरपालिकेच्या शाळेतील १०० शिक्षकांचे २ डिसेंबर ते ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत ५ दिवसीय क्रीडा प्रशिक्षण शिवशक्ती मंडळ क्रीडांगण व वृत्तपत्र विक्रेता भवन येथे संपन्न झाले. या पाच दिवसीय क्रीडा प्रशिक्षणामध्ये कबड्डी, खो-खो, क्रीडा पोषण, ट्रॅक अँड फिल्ड आदी बाबतचे मूलभूत अद्ययावत प्रशिक्षण माण देशी फाउंडेशन म्हसवड व महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
समारोप प्रसंगी बोलताना उपायुक्त वैभव साबळे म्हणाले की आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता साहेब यांचे मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महापालिकेच्या वतीने पायाभूत बदल करू. शिक्षकांना क्रीडा बाबतीत अद्ययावत राहण्यासाठी या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल. विद्यार्थ्यांना योग्य वेळी प्रोत्साहन दिले तर क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करतील. प्रत्येक शिक्षकाने आपल्या सेवाकाळात एक तरी विद्यार्थी राष्ट्रीय खेळाडू तयार करावा असे आवाहन केले.
प्रशिक्षणात छत्रपती शिवाजी महाराज गटाने उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, प्रशासन अधिकारी रंगराव आठवले, वरिष्ठ लेखापाल गजानन बुचडे, सहाय्य कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे, तात्यासाहेब सौंदते, रवी शिंदे, भारत बंडगर, संदीप सातपुते, राहुल होनमोरे, नसीमा पठाण, पूजा साळुंखे, पद्मा घोलप, धनश्री भाले, संभाजी जोशी, शहाजहान तांबोळी, जकी पटेल, चित्रा शिंगाडे, दिपाली पेटकर, सुधाकर हजारे, शंकर ढेरे, चंद्रशेखर राऊत, गुरांन्ना बगले, रेश्मा गिड्डे, अर्चना काटकर, दिपाली अटुगडे, अनिता काळेल, लता चव्हाण बेबिजान मकानदार, बाळाप्पा लोणी, असद पटेल, मुदस्सर म्हैसाळे, अरुण निळे, संतोष यादव, विशाल भोंडवे, अशोक नागरगोजे, रेणुका पाटील,मनोज प्रधान आदी शिक्षकानी नियोजन आणि प्रशिक्षणात उकृष्ठ कामगिरी बजावली.
तज्ञ प्रशिक्षक म्हणून माणदेशी फाउंडेशनचे प्रवीण फोगेरे, घोरपडे, ओंकार गोंजारी, वीरकर, बाबर, आवळे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रास्ताविक प्रशासनाधिकारी रंगराव आठवले तर आभार शहाजहान तांबोळी यांनी मांडले.