शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी रोखणार रत्नागिरी नागपुर महामार्ग
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, आणी समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला किती देणार हे सरकारने जाहीर करावे. या मागणीसाठी दि. १८ डिसेंबर रोजी रत्नागिरी नागपूर महामार्ग आंकली येथे रोखण्याचा निर्णय आज बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
कष्टकऱ्यांची दौलत येथे आज बाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली. दोन दिवसापुर्वी नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गास सांगली जिल्ह्यापर्यंत समर्थन आहे. ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी अलायमेंट बदलण्यात येईल. काही ठिकाणी फ्लायओहर बांधण्यात येतील. असे पत्रकार बैठकीत सांगीतले होते. या पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या सुरवातीस काॅम्रेड उमेश देशमुख यांनी आजपर्यंत केलेल्या आंदोलनाचा आढावा घेवुन दि. १८ डिसेंबर रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याची सुचना करुन, आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा दिला. यावेळी सतिश साखळकर यांनी आंदोलनास प्रत्येक गावातुन जास्तीत जास्त लोकांना घेवुन या आंदोलनात सहभागी व्हावे, असे अवाहन यावेळी केले. महेश खराडे यांनी पुढील काळात स्वाभिमानी स्टाईल आंदोलन करण्याचे अवाहन केले. या बैठकीस प्रभाकर तोडकर, सुनिल पवार , उमेश एडके , पैलवान विष्णु पाटील, यशवंत हारुगडे, प्रविण पाटील. इत्यादीसह शेतकरी उपस्थित होते.