तासगावात उद्या सकाळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची भव्य पदयात्रा,सायंकाळी मिरवणूक… मोठया संख्येने सहभागी होण्याचे श्री शिवप्रतिष्ठान कडून आवाहन
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : उद्या शिवतीर्थ गुरुवार पेठ येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मातृ पितृ इच्छापूर्ती दिन अर्थात श्री शिवप्रताप दिन साजरा करण्यात येणार आहे.श्री शिवछत्रपतींनी मांडलेल्या हिन्दवी स्वराज्याचा घास घेण्यास अफझलखान आला होता.मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी संयुक्त सप्तमी या तिथीला, म्हणजेच दिनांक १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी,श्री प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या तंबूत शिरुन,काही क्षणांतच,जसे नरसिंहाने हिरण्यकश्यपूस आपल्या मांडीवर घेऊन त्याचे पोट फाडले तसेच श्री शिवछत्रपतींनी अफझलखानाचा कोथळा काढून,त्याचे मुंडके छाटले.ते रक्ताने निथळणारे मुंडके घेऊन आई तुळजा भवानीच्या चरणी वाहण्यासाठीं ते आपल्या सहकाऱ्यांसह दौडत श्रीप्रतापगडावर गेले.तो दिवस हिन्दुस्थानच्या दृष्टीने इतिहासाला संपूर्ण कलाटणी देणारा दिवस होता.त्यामुळे हिन्दुस्थानचा स्वातंत्र्य दिवस म्हणून श्री दुर्गामाता दौडीप्रमाणे उद्या सकाळी 9 वाजता शिवतीर्थ येथून भव्य पदयात्रा (दौड ) काढण्यात येणार आहे.त्यानंतर सायंकाळी 5 वाजता शिवतीर्थ येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.आणि हा दिवस “मातृ पितृ इच्छापूर्ती दिन म्हणजेच अफझलखानाचा निर्दालन दिवस”म्हणून साजरा करणार आहोत.श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानच्या वतीने शिवप्रेमीना डोक्यावर पांढरी स्वदेशी टोपी अथवा भगवा फेटा बांधून आपापल्या मित्र मंडळींसह मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.