33 वी एक तास राष्ट्रवादीसाठी विचार मंथन बैठक संपन्न
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांनी ‘एक तास राष्ट्रवादीसाठी – आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी – प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी’ या उपक्रमाची संकल्पना मांडली होती.
या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी,संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहुन,या बैठकीमध्ये,देशाच्या,राज्याच्या जिल्ह्याच्या,तालुक्याच्या,सामाजिक,आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.
या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली शहरजिल्ह्याच्यावतीने सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या सुचनेनुसार आज एक तास राष्ट्रवादीची 33 वी बैठक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली जिल्हा कार्यालय याठिकाणी पार पडली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत बैठकीचे स्वरूप स्पष्ट केले.
बैठकीला संबोधित करताना युवक शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार म्हणाले की आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे,बूथ कमिट्या सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन केले.
महिला शहरजिल्हाध्यक्ष सांगिताताई हारगे यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरात लवकर सरकारने महिलांच्या खात्यात वर्ग करावे अन्यथा महिला राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन करण्यात आले.
स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक हरिदास पाटील यांनी बोलताना म्हणाले,प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सांगली राष्ट्रवादी निष्ठेने काम करेल.
सामाजिक न्याय विभागाचे शहरजिल्हाध्यक्ष उत्तमआबा कांबळे यांनी महापालिका क्षेत्रात सभासद नोंदणी करणेबाबत सूचना केल्या, पक्षाची पुरोगामी सामाजिक न्यायाची भूमिका आज बैठकीत स्पष्ट केली.
सांगली शहराचे अध्यक्ष मा.नगरसेवक सागर घोडके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सां.मि. कु.महानगरपालिका क्षेत्रातील बूथ कमिट्यांचा आढावा घेत मार्गदर्शन केले व बैठकीचे आभार मानत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहरजिल्ह्याचे युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार, महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिताताई हारगे ,सागर घोडके , हरिदास पाटील, उत्तम कांबळे ,बाळाराम जाधव ,समीर कुपवाडे ,तानाजी गडदे, छाया जाधव , वैशाली धुमाळ, शारदा माळी ,प्रियांका विचारे ,संगिता जाधव ,सुरेखा सातपुते
उमर गवंडी ,डॉ शुभम जाधव ,शितल खाडे , अरुण चव्हाण, विनायक हेगडे ,फिरोज मुल्ला ,प्रणवी पाटील ,अक्षय अलकुंटे , मुन्ना शेख , सरफराज शेख, आदित्य नाईक ,दत्ता पाटील , अमित चव्हाण , नंदकुमार घाडगे ,असीम फकीर , कुमार वायदंडे ,भारत चौगुले ,पूजा आवळे ,परवीन फकीर, सद्दाम मुजावर , राजू मुळके संजय पवार , लक्ष्मण मोने महादेव बनसोडे व आदर्श कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.