जैन समाजातील एकही माणूस गरीब राहता कामा नये या लठ्ठे साहेबांच्या स्वप्नपूर्ती साठी सभेची ताकद वाढवू या – भालचंद्र पाटील
प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.९ : दक्षिण भारत जैन सभा सव्वाशे वर्षाची झाली. सभेनं जैन समाज उन्नतीसाठी अनेक उपक्रम राबवले . तथापि सभेचा निधी,प्रगतीचा वर्गणीदार आणि आजीव सभासद संख्येत म्हणावी तशी वाढ झाली नाही. या पुढे जैनसमाजात एकही माणूस गरीब राहता कामा नये.प्रत्येक जैन घरातील मुलं -मुली उच्च शिक्षित होऊन आर्थिकदृष्टया सुदृढ होऊन स्वावलंबी झाली पाहिजेत. संपूर्ण जैन समाज दक्षिण भारत जैन सभेशी जोडला पाहिजे,संस्था अथवा कुटुंब असो आर्थिक सक्षमता ही अपरिहार्य ठरते. लठ्ठे साहेब अर्थशास्त्री होते. मुंबई इलाख्याचे अर्थमंत्री म्हणून बजेट मांडताना त्यांनीहाच विचार प्रकर्षाने व्यक्त केला होता असे उद्गार दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी काढले. दक्षिण भारत जैन सभेच्या कार्यालयात आयोजित दि. ब . आण्णासाहेब लठ्ठे जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी लठ्ठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलाने श्रद्धापूर्वक अभिवादन करण्यात आले.त्यानंतर अध्यक्षानी ‘जैन समाजातील प्रत्येकाला प्रगती माझ्या घरी आलाच पाहीजे, दक्षिण भारत जैन सभा ही आपली संस्था आहे . असे वाटण्या इतपत आता पुढील कामाचे नियोजन सुरु आहे. सभेच्या परतावू शिष्यवृती मुळे जे शिकले ते आता सभेच्या आवाहना नुसार घेतलेली रक्कम स्वतःची आणखी भर घालून सभेकडे देत आहेत. त्यामुळे आपल्याच मुलांना पुन्हा चांगली मदत देणे शक्य होणार आहे..समाजातील अनेक धनिकांना चांगल्या कार्याला मदत करण्याची इच्छा असते अशा सर्वाना सभेचा प्रवाहात आणून लठ्ठे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दक्षिण भारत जैन सभेची ताकद वाढवणे हेच त्यांना खरे अभिवादन होय अशी भावना व्यक्त केली.
यावेळी मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील, महामंत्री प्रा. एन.डी. बिरनाळे, पदवीधर संघटनेचे चेअरमन प्रा. एए मुडलगी, बा. भु. पाटील ग्रंथप्रकाशन मंडळाचे चेअरमन डॉ.सी.एन चौगुले व सेक्रेटरी एन. जे. पाटील,भाऊसाहेब पाटील,महिलाश्रमच्या चेअरमन अनिता पाटील, विणा आरवाडे, सुनिता चौगुले, सुरेखा मुंजापा, मंगल चव्हाण, छाया कुंभोजकर, सुरेश सांगावे, जिनेंद्र बुबनाळे, सुरेश फराटे, किरण मगदूम, विशाल भरमगुडे व अक्षय पाटील उपस्थित होते.