प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान वधाच्या जागे जवळ शिवजयंती पूर्वी अफजल खान वधाचे शिवप्रतापाचे तयार झालेले शिल्प तातडीने बसवा ; प्रतापगडावर शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाची घोषणाबाजी
प्रतिष्ठा न्यूज
सातारा प्रतिनिधी : प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्याभोवती वन खात्याच्या जागेवर जे इस्लामिक अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालं होतं ते काढण्यासाठी शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाच्या वतीने 21 वर्षे लढा दिला व 10 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील महायुतीच्या सरकारने धाडसी निर्णय घेऊन अफजलखानाच्या नावाने असलेला बेकायदेशीर दर्गा व त्या भोवतीचे बांधकाम बुलडोझर लावून जमीनदोस्त केले त्यानंतर आलेल्या शिवप्रताप दिनास महाराष्ट्रातील मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा प्रतापगडाच्या पायथ्याशी इस्लामिक अतिक्रमण बुलडोझर लावून जमीनदोस्त केल्याबद्दल अफजल खान वधाचे शिल्पा असलेली ट्रॉफी व पुष्पहार घालून सत्कार केला व त्यांना निवेदन दिले कि अफजल खान व सय्यद बंडा यांच्या थडग्यासमोर अफजल खान वधाचे म्हणजे *शिवप्रतापाचे भव्यशिल्प उभा करावे जेणेकरून भविष्यात पुन्हा अफजलखानाचे उद्दातीकरण होणार नाही. त्याचबरोबर हिंदी इंग्लिश मराठी मध्ये अफजल खान वधाचा शिवप्रतापाचा इतिहास लिहावा* व त्या परिसराचे नामकरण *श्री शिव प्रताप भूमी* असे करावे अशा आशयाचे निवेदन दिले असता राज्याचे मंगल प्रभाजी लोढा यांनी या मागणीची दखल घेऊन शासनाकडून अफजलखानवादाच्या शिल्पचे निविदा मागवल्या शिल्प चे काम पुण्याचे *शिल्पकार दीपक थोपटे* यांना मिळाले त्यांनी तो पुतळा पूर्णपणे बनवलेला असून चौथर्याच्या कामाचे रेखांकन सुद्धा झालेले आहे.
तरी राज्यातल्या सरकारने येत्या 19 फेब्रुवारी 2025 शिवजयंती पूर्वी सदरचे शिल्प बसवावे अशी मागणी कालच झालेल्या प्रतापगडावर झालेल्या शिवप्रताप दिनाच्या वेळी सातारा जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांना शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी दिले. व प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तयार झालेल्या शिल्पा चे फोटो फडकून बॅनर फडकून, घोषणाबाजी करून सदर शिल्प बसवण्याची मागणी शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी यांनी जोरदार मागणी केली. त्यानंतर शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाच्या शिष्टमंडळाने अफजलखान वधाचे शिल्प ज्या ठिकाणी उभारणार आहेत त्या जागेवर जाऊन कामाची पाहणी केली.
यावेळी हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष व शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक मा. नितीन शिंदे, माजी नगरसेविका मा. स्वातीताई शिंदे, हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव, हिंदू एकताचे शहर उपाध्यक्ष मा. राजू जाधव, सांगलीवाडी विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, खाणभाग विभाग अध्यक्ष अवधूत जाधव, पै.प्रदीप निकम, श्रीधर मिस्त्री, गजानन मोरे, अतुल नाझरे, अनुज निकम, निखिल सावंत, चेतन भोसले, पंकज कुबडे, मयूर निकम, आनंद उत्तेकर, उमेश पाटील इ. उपस्थित होते.