तासगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीतील अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पाठपुरावा करून देखील चार महिन्यांपासून तासगाव पोलिस टाळाटाळ करत आहेत, याप्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करावेत यासाठी मनसे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी आजपासून तासगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.यावेळी बोलताना अमोल काळे यांनी सांगितले की विशेष लेखापरीक्षक यांनी दिलेल्या अहवालात सांगितले की कृषी उत्पन्न बाजार समिती तासगावचे १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च२०२१ या मुदतीचे लेखा परिक्षण पूर्ण कले असून, त्याचा लेखापरिक्षणचा अहवाल दि. ०९ जानेवारी २०२४ रोजी सादर केला आहे,त्या अहवाला नुसार बाजार समितीमध्ये झालेला अपहार हा विस्तारीत बेदाणा शेतीमाल बांधकामाच्या अनुषंगाने झाला आहे. हा अपहार त्रयस्त मुल्यांकनकार यांचे तपासणी अहवालानंतर निदर्शनास आलेला आहे.तरी संबंधितावरं गुन्हा दाखल करा असा प्रस्ताव लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी २९ ऑगस्ट २०२४ रोजी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना दिला आहे परंतु राजकीय दबावा मुळे पोलीस प्रशासन टाळा टाळ करत असल्याने आम्ही आमरण उपोषण करत आहोत.आंदोलनास मोठया संख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित आहेत.