तासगांव-मिरज महामार्गावर फक्त खराब रस्त्याचेच डांबरीकरण सुरू; पूर्ण रस्ता करण्याची नागरिकांची मागणी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेल्या तासगांव- मिरज राज्य महामार्गावर डांबरीकरण सुरू करण्यात आले आहे.ज्या ठिकाणी अत्यंत खराब रस्ता आहे तेवढाच रस्ता डांबरी करन केले जात असून संपूर्ण रस्त्याचे सरसकट डांबरीकरण करावे अशी मागणी वाहन धारक व प्रवासी करतं आहेत.या महामार्गावर अनेकवेळा लहान मोठे अपघात झाले आहेत.प्रसंगी लोकांचे नाहक बळी गेले आहेत.बहुतांश नागरिक अधू झाले.वाढत्या खड्ड्यांमुळे महामार्गाची चाळण झाल्याने वाहन चालकांचे कंबरडे मोडले होते. विशेषतः कवठे एकंद ते कुमठे फाटा, एम आय डी सी,तानग फाटा दरम्यान रस्त्यावरील खड्डे डोकेदुखी बनली होती.या हद्दीतील झालेल्या ह्या खड्ड्यांकडे प्रशासना कडून हेतुपुरस्सररित्या डोळेझाक केली जात असल्याचे निदर्शनास येत होते.गेली 3 महिन्यापासून ट्रॅक्टरने ऊस वाहतूक मोठया प्रमाणात सुरू असून आतापर्यंत 4ते 5उसाने भरलेले ट्रॅक्टर पलटी झाले आहेत.त्यामूळे अनेक वेळा रस्ता वाहतुकिसाठी बंद झाला होता.त्यातच रस्ता अरुंद असल्याने वाहन धारकांना कसरत करत वाहन चालवावे लागतं होते.त्या पार्श्वभूमीवर आता रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.महामार्गावरील खड्डे, दिशादर्शक फलक,दुभाजकावरील वाढलेली झाडे,स्पीडब्रेकर,व्हाईट साईड पट्टी,साईडपट्ट्या मजबूत करणे,वळणे,धोकादायक ठिकाणे व अपघातग्रस्त ठिकाणी सूचनाफलक लावणे,उताराच्या व वळणाच्या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करणे, धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने विविध ठिकाणी रेडियम लाईट अशा विविध आवश्यक बाबींची प्रशासनाने पूर्तता केल्यास भविष्यातील अपघात कमी होतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.