विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम तातडीने सुरू करा; मलिक रेहानच्या दर्ग्यावर बुलडोजर फिरवा: माजी आमदार नितीन शिंदे यांची मागणी; कोल्हापूर येथे जोरदार आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने विशाळगडावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे. मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान बाबाच्या दर्ग्याचे अतिक्रमण जमीन दोस्त करावे. विशाळगडावरील उरुसाला कायमस्वरूपी बंदी करावी. कोणत्याही प्रकारची पशु हत्या किल्ले विशाळगडावर करण्यात येऊ नये, तसेच किल्ले विशाळगडावरती नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे यांचे स्मारक उभे करण्यात यावे अशा मागण्यांसाठी कोल्हापूर येथे जोरदार आंदोलन करण्यात आले.
शिवभक्तांनी, हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जमून घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. विशाळगडावरील अतिक्रमण जमीन दोस्त झालेच पाहिजे अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता. पावसाळ्याचे कारण पुढे करून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्याची थांबवलेली मोहीम तातडीने सुरू करावी आणि उर्वरित बेकायदेशीर बांधकामे तात्काळ हटवावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये या सर्व मागण्यांचा पुनरुच्चार हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर केला. 10 x 10 च्या थडग्याच्या सभोवती सुमारे वीस हजार स्क्वेअर फुट बांधकाम बेकायदेशीरपणे दर्ग्याचे करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. मलिक रेहानच्या थडग्याच्या सभोवती केलेले बेकायदेशीर अतिक्रमण बांधकाम तात्काळ हटवावे. जोपर्यंत विशाळगड अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत विशाळगड पर्यटकांसाठी खुला करू नये. अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली. माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही तात्काळ विशाळगडावरील मोहीम सुरू करू असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. 157 पैकी 94 बांधकामे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने तोडली आहेत उर्वरित बांधकामे देखील न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून तोडली जातील असे यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी दीपक देसाई, संजय जाधव, विष्णुपंत पाटील, चंद्रकांत बराले, गजानन तोडकर, संदेश देशपांडे, बाळासाहेब मोहिते, मनोज साळुंखे, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, अरुण वाघमोडे, रवी वादवणे, प्रदीप निकम, गजानन मोरे, गणेश नारायणकर, प्रतीक डिसले, विनायक काळेल, अक्षय पाटील, नारायण हांडे, श्रीधर मेस्त्री, निखिल सावंत, ओंकार शिंदे यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.