गंगामाई येई कृष्णामाईच्या भेटीला’! सांगलीत कृष्णामाई महोत्सव 2025 हा 7 ते 12 फेब्रुवारी रोजी कृष्णा नदीवर आयोजित करण्यात येणार बैठक सांगलीकरांचा निर्णय मी एक सांगलीकर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गंगामाई येई कृष्णामाईच्या भेटीला’! सांगलीत कृष्णामाई महोत्सव 2025 हा 7 ते 12 फेब्रुवारी रोजी कृष्णा नदीवर आयोजित करण्यात येणार आहे. असा निर्णय कृष्णा घाटावर आयोजित करण्यात आलेला बैठक सांगलीकरांचा वतीने घेण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार सुधीरदादा गाडगीळ होते. कृष्णामाई ही आपल्या सर्वांसाठी जलजीवन वाहिनीअसून ती गंगामाई नदीची मोठी बहीण आहे. वर्षातून एकदा गंगामाई आपल्या कृष्णमाईच्या भेटीसाठी येते तो क्षण म्हणजे “कृष्णामाई” महोत्सव म्हणून आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करूया. असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केले.
यावेळी आमदार सुधीरदादा बोलताना म्हणाले..पूर्वी सांगली संस्थानकाळात कृष्णामाईचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता. मात्र काळाच्या ओघात तो बंद पडला होता. तो पुन्हा सुरू होत आहे. यासाठी जे पण मदत लागेल ती मी सांगलीकर म्हणून करणे असे आश्वासन सुधीर गाडगीळ यांनी दिले. कृष्णामाई मंदिराचे पुजारी श्री जोशी काका घोडेवाले या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी कृष्णामाई व गंगामाई याचे महत्व सांगितले.
यावेळी उपायुक्त वैभव साबळे म्हणाले.. कृष्णामाई महोत्सवाला लोकवर्गणीतुन आणि महापालिकेकडून 50 टक्के खर्च करू असे आश्वासन त्यांनी दिले. याठिकाणी साप्रदायिक संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ब्रह्मकुमारी, सद्गुरू कलावती आई, सद्गुरु वामनराव पै, सनातन प्रभात, सद्गुरू अनिरुध बापू उपासना केंद्र, स्वामी समर्थ मंदीर, बाळूमामा मंदीर, हिंदू जनजागृती सर्व वारकरी सम्रदाय, सत्य साईबाबा प्रतिष्ठान, हरिदास लेंगरे मथाडी संघटना संजीवनी हनुमान सेवाभावी संस्था, चे पदाधिकारी ही उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी आमदार दिनकर पाटील, उर्मिला बेलवणकर, पृथ्वीराज पवार, तानाजी सावंत, , स्वाती शिंदे, गीतांजली ढोपे-पाटील, भारती दिगडे, उत्तम मोहिते, जगन्नाथ ठोकळे,अजय उबाळे, रवींद्र बेंडखळे,सुनील पवार, रुक्मिणी आंबिगिरे, महादेव गाडगीळ,श्रीकांत शिंदे,हेमंत खंडागळे,समीर लालबेग, अविनाश मोहिते, संदीप ताटे, सारंग पवार, स्वप्निल मस्कर,सचिन कदम,सुधीर चव्हाण,सर्जेराव पाटील उपस्थित होते.